शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाच्या उत्तर झोनचे कर्मचारी लेटलतीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:15 IST

अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी सकाळी उत्तर झोनमधील कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागासह चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा हजेरी लावत असल्याचे आढळून आले. संबंधित लेटलतीफ कर्मचार्‍यांची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त वाघ यांनी उत्तर झोन कार्यालयातील हजेरी पुस्तक ताब्यात घेतले असून, कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत. 

ठळक मुद्देआयुक्तांनी घेतली झाडाझडती; हजेरी पुस्तक ताब्यात घेतले! 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी सकाळी उत्तर झोनमधील कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागासह चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा हजेरी लावत असल्याचे आढळून आले. संबंधित लेटलतीफ कर्मचार्‍यांची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त वाघ यांनी उत्तर झोन कार्यालयातील हजेरी पुस्तक ताब्यात घेतले असून, कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत. महापालिकेच्या आस्थापनेवर २ हजार २00 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. २0१२ मध्ये अकोलेकरांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी झोन कार्यालयांचे गठन करण्यात आले. त्यासाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. झोन कार्यालयांमध्ये दैनंदिन साफसफाई, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था तसेच मालमत्ता कर वसुली विभागाचे कामकाज पार पडते. या कार्यालयांमध्ये कर्मचारी खरोखर कितपत हजेरी लावतात, याची कोणतीही तपासणी होत नसल्यामुळे झोन कार्यालयांचे कामकाज ढेपाळल्याची परिस्थिती आहे. बुधवारी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उत्तर झोनचे सभापती मोहम्मद नौशाद यांच्या प्रभागातील समस्यांची पाहणी केली. त्यानंतर सकाळी १0.१५ वाजता उत्तर झोन कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता, ११ वाजेपर्यंत मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागाचे कर्मचारी कार्यालयात हजर झाले नसल्याचे आढळून आले. 

आयुक्तांनी घेतली हजेरीमनपा कार्यालयात सकाळी १0.३0 वाजता हजेरी लावणे बंधनकारक आहे. उत्तर झोनमध्ये कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे पाहून महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वत: कर्मचार्‍यांची हजेरी घेतली. अनेक कर्मचार्‍यांना शासकीय कार्यालयाची वेळ कोणती, याची माहितीच नसल्याचे समोर आले. 

शासकीय कार्यालयांमध्ये किती वाजता हजर राहावे लागते, याबाबत मनपा कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे पाहून आश्‍चर्य वाटले. थम्ब मशीनसाठी अनेक कर्मचार्‍यांनी जाणीवपूर्वक नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे. यानंतर हजेरीसाठी थम्ब मशीनचा वापर अनिवार्य केला जाईल. -जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाEmployeeकर्मचारी