शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'सर्वोपचार'मध्ये मिळणार राज्यातील रुग्णालयातील खाटांची अद्ययावत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:03 IST

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात स्क्रीन लावण्यात आली असून, यावर राज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची संख्या तसेच इतर आवश्यक माहिती दर्शविण्यात येणार आहे.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात स्क्रीन लावण्यात आली असून, यावर राज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची संख्या तसेच इतर आवश्यक माहिती दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे दुर्धर आजारांनी पीडित दुर्बल घटकातील रुग्णांना होणारा त्रास टाळणे शक्य होणार असून, याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या स्क्रीनचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना माहिती देताना ते बोलत होते. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. अशोक ओळंबे, धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने, सहायक धर्मादाय आयुक्त शुभांगी नामघाडगे, रुग्ण निरीक्षक ज्योती दांदळे, उज्ज्वला गव्हाळे आदींसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरात धर्मादाय न्यासाकडे नोंदणी केलेल्या नामांकित रुग्णालयात निर्धन घटकातील रुग्णांसाठी दहा टक्के, तर दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जातात. या सुविधेचा दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना लाभ मिळण्यासाठी या रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत, याची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात टीव्ही स्क्रीन लावण्यात आली आहे. निर्धन रुग्णांसाठी अशा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात, तर दुर्बल घटकांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. ही सुविधा प्रथमच आपल्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.दुर्बल घटकांसाठी दहा टक्के खाटा आरक्षितराज्यातील मोठ्या शहरांतील धर्मादाय न्यासाकडे नोंदणी केलेल्या नामांकित रुग्णालयात निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जातात. सुविधाचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी धर्मादाय उपायुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन धर्मादाय उपायुक्त किशोर मसने यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील