शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीज मीटरचे उशिरा रिडिंग, ग्राहकांना भुर्दंंड !

By admin | Updated: September 24, 2016 03:01 IST

३0 दिवसांनंतर रिडिंग घेण्याचे बंधन; मात्र कंत्राटदाराकडून होते हलगर्जी.

अकोला, दि. २३- विजेचे वाढते बिल हे ग्राहकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. विजेचा वापर व येणारे बिल यावरून अनेकदा महावितरणचे अधिकारी व ग्राहकांमध्ये खटके उडत असतात. या वाढीव वीज बिलामागे विजेच्या दरात होणारे चढ-उतार कारणीभूत आहेतच; परंतु उशिरा मीटर रिडिंग घेण्याचाही फटका ग्राहकांना बसत असल्याचे समोर आले आहे. विजेच्या वापरानुसार विजेचा दर आकारला जातो. पहिल्या शंभर युनिटसाठी ३ रुपये ७६ पैसे प्रतियुनिट दर आहे, तर शंभर युनिटच्या वर रिडिंग गेल्यास हेच दर दुप्पट म्हणजेच ७ रुपये २१ पैसे प्रतियुनिट आहे. विजेचा वापर हा ३00 युनिटपेक्षाही जास्त झाल्यास दर तिप्पट म्हणजे ९ रुपये ९५ पैसे प्रतियुनिट आहे. ५00 च्या वर हाच दर ११ रुपये ३१ पैसे होतो. या दरानुसार प्रत्येक ग्राहकाचे वीज मीटर रिडिंग हे तीस दिवसांचे घेणे अपेक्षित आहे.प्रत्यक्षात मात्र तीस दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर वीज मीटरचे रिडिंग घेतले जात असल्याने ग्राहकांना विजेच्या दरातील बदलाचा फटका बसतो. समजा तीस दिवसांत मीटर रिडिंग घेतले व हे रिडिंग १00 युनिटपर्यंत असेल, तर त्याला लागणारा दर हा सर्वात कमी आहे; मात्र तीस दिवसांनंतर हेच रिडिंग घेण्यात आले, तर ते निश्‍चितच शंभर युनिटपेक्षा जास्त होते व त्यामुळे वीज दराचा दुसर्‍या क्रमांकाचा म्हणजेच प्रतियुनिट ७ रुपये २१ पैसे हा दर लागतो.वीज मीटर रिडिंग घेण्यासाठी महावितरणने कंत्राट दिले असून, या कत्रांटदाराने तीस दिवसांच्या आत रिडिंग घेणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. अनेकदा तर वीज बिलावर मीटरचा फोटोही नसतो तसेच तीस दिवस उलटल्यानंतर मीटर रिडिंग घेतले जाते. या सर्व प्रकाराकडे महावितरणने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या संदर्भात महावितरणचे कुठलेही अधिकारी अधिकृत बोलायला तयार नाहीत. मात्र तीस दिवसांनंतर मीटर रिडिंग जरी नोंदविण्यात आले असले, तरी वीज बिल तयार करताना तीस दिवसांचाच कालवधीच नोंदविला जातो. तशी रचनाच संगणकाद्वारे आहे अशी माहिती मिळाली असली तरी प्रत्यक्षात मात्र वाढलेल्या ३0 दिवसानंतरचे विज देयक १00 युनिटपेक्षा जास्त झाले तर वाढीव दराचा भुर्दंंड ग्राहकांना बसत आहे. याकडे महावितरणचे दूर्लक्ष होत आहे.