लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केडिया प्लॉटमध्ये असलेल्या तसेच हॉटेल व्यवसायात प्रसिद्ध राठी पेढेवाला यांच्या हॉटेलमधून नेण्यात आलेल्या राइस प्लेटमध्ये अळी निघाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. राठी पेढेवालाशेजारीच असलेल्या एका खासगी रुग्णालयातील रुग्णासाठी राइस प्लेट नेण्यात आली होती. सदर रुग्ण हे राइस जेवण करीत असतानाच ती अळी हलल्याने रुग्णास दिसली व त्यांनी या प्रकाराची तक्रार केली. अकोट येथील रहिवासी चंद्रकांत सावजी हे राठी पेढेवालानजीक असलेल्या येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा संतोषने शेजारीच असलेल्या राठी पेढेवाला यांच्या हॉटेलमधून बुधवारी १२ वाजताच्या सुमारास एक राइस प्लेट खरेदी केली. सदर राइस प्लेट वडिलांसाठी रुग्णालयात घेऊन गेले. त्यांच्या वडिलांनी राइस प्लेट उघडून खाण्यास सुरुवात करताच दुसर्याच घासाला पाहिले तर त्यात वरच एक अळी शिजलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी पुन्हा ती प्लेट राठी पेढेवाला यांच्याकडे नेली. त्यांना संपूर्ण राइस प्लेट दाखवली. त्यानंतर राठी यांनी दुसरी प्लेट घेऊन जाण्याचे सांगितले; मात्र दुसर्या प्लेटमध्येही अशाच प्रकारे अळ्या असल्या तर, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी दुसरी राइस प्लेट घेण्यास नकार दिला. राठी पेढेवाला यांच्या हॉटेलमधील राइस प्लेटमध्ये अळी निघाल्यानंतर या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन चौकशी करणार असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.-
राठी पेढेवालाच्या राइस प्लेटमध्ये अळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:27 IST
अकोला : केडिया प्लॉटमध्ये असलेल्या तसेच हॉटेल व्यवसायात प्रसिद्ध राठी पेढेवाला यांच्या हॉटेलमधून नेण्यात आलेल्या राइस प्लेटमध्ये अळी निघाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. राठी पेढेवालाशेजारीच असलेल्या एका खासगी रुग्णालयातील रुग्णासाठी राइस प्लेट नेण्यात आली होती. सदर रुग्ण हे राइस जेवण करीत असतानाच ती अळी हलल्याने रुग्णास दिसली व त्यांनी या प्रकाराची तक्रार केली.
राठी पेढेवालाच्या राइस प्लेटमध्ये अळी
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाकडे तक्राररुग्णासाठी नेली होती राइस प्लेट