शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळय़ात भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांचे बयान अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:22 IST

अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने भूमी अभिलेख विभागाच्या तत्कालीन उपअधीक्षिका सारिका कडू यांचे सोमवारी बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडू आणि आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश अणे यांच्यात बयान नोंदविण्यावरून तु-तु-मै-मै झाल्यानंतर, हे बयान अर्धवट नोंदविण्यात आले. दरम्यान, कडू यांनी सदर बयान दुसर्‍या अधिकार्‍यांमार्फत नोंदविण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

ठळक मुद्देदुसर्‍या अधिकार्‍यांमार्फत बयान नोंदविण्याची मागणी

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने भूमी अभिलेख विभागाच्या तत्कालीन उपअधीक्षिका सारिका कडू यांचे सोमवारी बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडू आणि आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश अणे यांच्यात बयान नोंदविण्यावरून तु-तु-मै-मै झाल्यानंतर, हे बयान अर्धवट नोंदविण्यात आले. दरम्यान, कडू यांनी सदर बयान दुसर्‍या अधिकार्‍यांमार्फत नोंदविण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन, हा भूखंड कागदोपत्री हडपला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. या प्रकरणात तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करताना भूमी अभिलेख विभागाच्या तत्कालीन उपअधीक्षिका सारिका कडू यांचे सोमवारी बयान नोंदविण्यासाठी नोटीस देऊन बोलावले. दुपारी एक वाजता बयाननोंदविणे सुरू झाले; मात्र कागदावरील काही बयान पोलिसांनी मनानेच नोंदविल्याच्या कारणावरून कडू यांनी अर्धवट बयान दिले. त्यानंतर पुन्हा चार वाजता इन कॅमेरा बयान नोंदविण्याचे सुरू झाले. मात्र, पुन्हा वाद झाल्यानंतर कडू यांनी बयान न नोंदविता थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून या प्रकरणात दुसर्‍या अधिकार्‍यांमार्फत बयान नोंदविण्याची मागणी केली, तर कडू यांनी पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. तसेच त्यांनी बयान न नोंदविताच कार्यालयातून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

इन कॅमेरा बयानआर्थिक गुन्हे शाखा प्रमुख गणेश अणे यांनी सारिका कडू यांचे बयान इन-कॅमेरा नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बयान पूर्ण होऊ शकले नाही. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास कडू असर्मथ ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर बयानातील वाक्य पोलिसांनी मनानेच टाकल्याचा आरोप कडू यांनी लोकमतशी बोलताना केला. याच आरोप-प्रत्यारोपामुळे कडू यांचे बयान नोंदविण्यात आले नसून, ते लवकरच नोंदविण्यात येणार आहे.