शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कार्यालयाची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:15 IST

शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप केलेल्या प्रकरणाची दखल घेत खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल यांनी भूमी अभिलेख कार्यालयाची बुधवारी झाडाझडती घेतली. एक महिन्याचा कालावधी उलटल्यावरही भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याने या लोकप्रतिनिधींनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची कानउघाडणी करीत येथील गोंधळलेल्या कारभारावर ताशेरे ओढले.

ठळक मुद्दे२0 कोटींचा भूखंड हडपल्याचे प्रकरण खासदार, आमदारांनी केली कारवाईस विलंब करणार्‍यांवरही फौजदारीची मागणी 

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप केलेल्या प्रकरणाची दखल घेत खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल यांनी भूमी अभिलेख कार्यालयाची बुधवारी झाडाझडती घेतली. एक महिन्याचा कालावधी उलटल्यावरही भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याने या लोकप्रतिनिधींनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची कानउघाडणी करीत येथील गोंधळलेल्या कारभारावर ताशेरे ओढले. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस व भूमी अभिलेख विभागात होताच हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले. गत एक महिन्यापासून ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. बुधवारी खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी भूमी अभिलेख विभागात धाव घेऊन कारवाईस विलंब करणार्‍यांवरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक अजय कुळकर्णी यांनी या प्रकरणात अद्याप कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित करीत, ही दिरंगाई का करण्यात येत आहे. तसेच दिरंगाई करणार्‍यांवरही फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रकरणाच्या दस्तावेजांची तपासणी केली असता, ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले प्रत्येक वृत्त तंतोतत खरे ठरले. या भूखंडाच्या दस्तावेजांचे पूर्ण हस्तलिखित आणि संगणकीय दस्तावेज तपासले असता, त्यामध्ये मोठा घोळ समोर आला. भूमी अभिलेख विभागाच्या या कारभाराची पूर्ण तपासणीच लोकप्रतिनिधींनी करता, या विभागाने मोठा घोळ घालून ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर आ. सावरकर यांनी या प्रकरणात तातडीने फौजदारी तक्रार देण्याचे सांगितले, यावर अधीक्षक कुळकर्णी यांनी गुरुवारीच पोलिसात तक्रार देणार असल्याचे आश्‍वासन दिले. लोकप्रतिनिधींनी या विभागाची चांगलीच झाडाझडती घेतल्याने आता अनेकांचे धाबे दणणाले आहेत.यावेळी उपमहापौर वैशाली शेळके, भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, महिला व बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल, नगरसेवक सागर शेगोकार, संजय बडोणे, तक्रारकर्ते अमर डिकाव उपस्थित होते.

तब्बल ३0 पेक्षा जास्त भूखंडांचा घोळभूमी अभिलेख विभागातील दस्तावेजांची लोकप्रतिनिधींनी तपासणी केली असता  शहरातील तब्बल ३0 च्यावर भूखंडाचा अशाप्रकारे घोळ घालण्यात आल्याचे यावेळी समोर आले. एवढेच नव्हे, तर शहरातील दोन ओपन स्पेसही नव्यानेच हडपण्यात आल्याचे उघड झाले. ‘ब’ सत्ता जागेच्या पत्रकांचा तर मोठा घोटाळाच यावेळी समोर आला. १ हजार ३0६ पत्रकांपैकी काही पत्रकांवर मुदत देण्यात आली नव्हती, तर काही पत्रकांवर भाडेतत्त्वावर ज्यांना दिले त्यांचे नाव नव्हते, काही ठिकाण दिनांक नव्हती. एकूणच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांच्या संगनमतानेच शहरातील शासनाच्या मालकीचे भूखंड खुलेआम हडपण्याचे सत्र सुरू करण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला.

पोलिसांसमोर भूमी अभिलेख तोंडघशीभूमी अभिलेख विभागाने सिटी कोतवाली पोलीस दिरंगाई करीत असल्याचे लोकप्रतिनिधींना सांगताच लोकप्रतिनिधींनी ठाणेदार अनिल जुमळे यांच्याशी संपर्क केला. जुमळे यांनी तत्काळ कार्यालयात येऊन या विभागाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. या विभागानेच नावे देण्यास विलंब केला असल्याचेही जुमळे यांनी कुळकर्णी यांच्यासमोर सांगितले. १ जानेवारी २0१५ ते ३१ डिसेंबर २0१५ या कालावधीत कार्यरत असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर या विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर प्रकार २0१५ मध्ये झाला नसल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यास थांबविले. त्यानंतर वारंवार पत्र देण्यात आले, या विभागाने दोषी अधिकारी-कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्याचा पूर्ण प्रयत्न केला. 

गजराज मारवाडी प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोकसंगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हडपण्यात आलेला २0 कोटींचा भूखंड घोटाळा हे केवळ हिमनगाचे टोक आहे. या टोकाखाली असलेला भ्रष्टाचाराचा प्रचंड विस्तार भूमी अभिलेख विभागात सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील बहुतांश भूखंड अशा प्रकारे हडप करण्यात आले असून, यामध्ये या विभागाची मोठी भूमिका आहे. यामध्ये बाहेरील एक उच्चशिक्षित व्यक्ती असून, तोच हे सर्व घडवून आणत असल्याचेही यावेळी समोर आले. या विभागातील काही जुने कर्मचारी बदली झाल्यानंतरही हा विभाग चालवित असल्याचा आरोप करण्यात आला.

हस्तलिखित दस्तावेज दिल्यानंतर खर्‍या प्रकरणात ऑनलाइन नोंद घेण्यास संबंधित मालकाला हैराण करणार्‍या या विभागाच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी गजराज मारवाडी प्रकरणात मोठी दक्षता दाखवित ही ऑनलाइन नोंद घेतली. सर्व प्रक्रिया टाळून हा घोटाळा करण्यात आला असून, यामधील प्रत्येक जबाबदार आणि दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, - संजय धोत्रे, खासदार.

भूमी अभिलेख विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. या कार्यालयात मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट करण्यात येत असून, याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष आहे. पैसे घेऊन शासनाचे भूखंड दुसर्‍याच व्यक्तीच्या नावे बेकायदेशीररीत्या करण्यात येत असून, यामध्ये एक मोठी साखळी कार्यरत आहे. त्यामुळे पोलिसांनी या साखळीचा पर्दाफाश करून त्यांना बेडया ठोकाव्यात.- गोवर्धन शर्मा, आमदार, अकोला पश्‍चिम.

या प्रकरणामध्ये अनेकांचे हात ओले झालेले आहेत. त्यामुळे वरिष्ठांना वाचविण्याचा घाट घालण्यात येत असून, कनिष्ठ आणि निर्दोष कर्मचार्‍यांना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार हाणून पाडण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी व बाहेरील व्यक्तीवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, म्हणजे अशा प्रकारे घोटाळा करणार्‍यांची चेहरे समोर येणार आहेत.- रणधीर सावरकर, आमदार अकोला पूर्व.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे; मात्र कावड बंदोबस्त, गणेशोत्सव बंदोबस्तामुळे पुढील कारवाई करण्यास अडचणी आल्या. या प्रकरणात मोठय़ा अधिकार्‍यांसह मक्तेदारी असलेले काही कर्मचारी व बाहेरील व्यक्तींचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे बयाणही नोंदविण्यात आले आहेत.- अनिल जुमळे, ठाणेदार, सिटी कोतवाली.