शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

मी केवळ जनतेचा आमदार असं म्हणणारे लालाजी निराळेच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By नितिन गव्हाळे | Updated: November 4, 2023 14:30 IST

आ. शर्मा यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटूंबियांचे केले सांत्वन

नितीन गव्हाळे

 अकोला: लालाजींशिवाय अकोल्याची कल्पना करवत नाही. वर्षानुवर्ष अकोल्याला यायचे म्हणजे, लालाजी. अशा प्रकारची आमची भावना होती. राजकारणामध्ये त्यांच्यासारखे व्यक्तीमत्व फार कमी आहेत. निस्वार्थ काय असतं. याचे ते उदाहरण होते. ते असे नेते होते की, राज्यमंत्रीपद मिळालेलं असूनही सोडून देत, मी केवळ जनतेचा आमदार असे म्हणणारे गोवर्धन शर्मा हे निराळेच व्यक्तीमत्व होते. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना, शनिवार ४ ऑक्टोबर रोजी फडणवीस यांनी त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी लालाजींच्या पत्नी गंगोदेवी शर्मा, ज्येष्ठ चिरंजिव कृष्णा शर्मा, प्रा. अनुप शर्मा यांचे सांत्वन केले.अनेक आठवणी सांगताना, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लालाजी निवडणुकीत उभे राहायचे नाही. असे ठरवायचे. पण आमच्या आग्रहाखातर ते निवडणूक लढवायचे आणि जिंकुनसुद्धा यायचे. जनतेचे प्रेम लाभलेला नेता...ही त्यांची ओळख होती. त्यांचे निधन हे आमच्यासाठी धक्कादायक आहे.

अकोल्याला नेण्यासाठी लालाजींचा आग्रह

आमदार गोवर्धन यांच्यावर मुंबईतील हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. तेव्हा त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती. त्यांनी कुटूंबियांकडे अकोल्याला नेण्याचा आग्रह धरला होता. अकोल्यातच मृत्यू यावा. अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे कुटूंबियांनी डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांना अकोल्यात आणले.

ते पत्र आणायचे, मी सही करायचो!

आमदार शर्मा यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांची राहिली. मी वयाने लहान असून, त्यांनी जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबध जपले होते. मुख्यमंत्री म्हणून एखादं काम घेऊन लालाजी यायचे आणि हक्काने हे पत्र आहे, त्यावर मला सही करायला सांगायचे आणि मीही सरळ सही करायचो. ते नेहमीच जनतेसाठीच मागत राहिले. युती सरकारच्या काळात त्यांना राज्यमंत्री केले. ते एकमेव राज्यमंत्री आहे की, त्यांनी पक्षाकडे मला मंत्रीपद नको, आमदारच राहु द्या. असे सांगुन त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. १५ वर्ष रेल्वेगाडीत त्यांच्यासोबत प्रवास केला. २५ वर्ष विधानसभेत त्यांच्यासोबत काम केले. अशी आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.