बाळापूर: तालुक्यातील खामखेड येथे अज्ञात चोरट्यांनी बुधवार, ४ जून रोजी रात्री ११.00 वाजताच्या सुमारास ५ वेगवेगळय़ा ठिकाणी घरफोडी करून सोने-चांदीच्या दागिन्यांसह अंदाजे ३ लाखांचा ऐवज लंपास केला. खामखेड येथील शेषराव इंगळे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी रात्रीच्या सुमारास भारनियमन सुरू असताना आपले कुटुंब गच्चीवर झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी त्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सोने-चांदीचे दागिने तसेच रोख ७५ हजार, असा २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास केला. तसेच अज्ञात चोरट्यांनी प्रकाश गिरी यांच्या घरात प्रवेश करून सोन्याची १५,५00 रुपयांची अंगठी, राहुल इंगळे यांच्या घरातून १२,५00 रुपये, छोटू कदम यांच्या घरातून ३ हजार, तर नीळकंठ टाले यांच्या घरातून चांदीची नाणी लंपास केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तीन लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: June 6, 2014 01:17 IST