शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

शिवभाेजन केंद्रांची लाेकप्रतिनिधींनी घेतली झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 10:52 IST

Shivbhojan Center in Akola : अतिशय कमी कालावधीत थाळीचे वाटप करून केंद्र बंद करण्यात आल्याचा प्रकार पाहणीत आढळून आला.

अकाेला : शहरातील शिवभाेजन केंद्रांच्या माध्यमातून गरजू व गरीब नागरिकांना शिवभाेजन थाळीचे वाटप केले जात असल्याचे दावे प्रशासनाकडून व संबंधित संस्थाचालकांकडून केले जात असतानाच शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केलेल्या आकस्मिक पाहणीत प्रशासनाचे दावे फाेल ठरल्याचे दिसून आले. शिवभाेजन केंद्रांद्वारे अतिशय कमी कालावधीत थाळीचे वाटप करून केंद्र बंद करण्यात आल्याचा प्रकार पाहणीत आढळून आला. यावेळी आ. सावरकर यांनी केंद्रातील उपस्थितांची चांगलीच कानउघाडणी केली.

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केल्यानंतर आता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यादरम्यान, गरजू व गरीब नागरिकांना दाेन वेळच्या जेवणाची साेय उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचा समावेश आहे. यामध्ये गरजूंना मोफत धान्य व शिवभाेजन केंद्रांच्या माध्यमातून माेफत थाळी देण्याचा समावेश आहे़ स्थलांतरित मजूर, बाहेरगावचे विद्यार्थी व बेघरांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात प्रत्यक्षात २६ लाख लाेकसंख्या असून, जिल्ह्यात १५ केंद्रांच्या माध्यमातून फक्त ३ हजार थाळींचे वितरण करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांनी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य जिल्हा स्त्री रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली असता अल्प वेळेतच थाळीचे वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे अनेक गरजूंना परत जावे लागल्याचा प्रकार समाेर आला.

 

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

गरजूंना माेफत अन्नधान्य व थाळीचे वाटप केले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत आ. रणधीर सावरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाेबत संवाद साधण्यात आला असता माेफत अन्नधान्य वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत शासनाचे निर्देश प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी सांगितले. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने आदी उपस्थित हाेते़

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयRandhir Savarkarरणधीर सावरकरAkolaअकोला