शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोजागरीला दुधाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:54 IST

अकोला : दैनंदिन वापरापेक्षा उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त  जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याचवेळी ही  गरज भागवण्यास शासकीय दुध योजना असर्मथ ठरत आहे.  बुधवारी दिवसभर इतर जिल्हा दुध संस्थांशी संपर्क साधल्यानं तरही तेथून पुरवठा होण्याची शक्यता मावळली. त्यामुळे संपूर्ण  जिल्ह्यात खासगी दुध उत्पादक संस्थांना बाजार खुला राहणार  आहे.

ठळक मुद्देशासकीय दूध संस्था असर्मथ खासगी उत्पादकांना बाजार खुला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दैनंदिन वापरापेक्षा उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त  जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढणार आहे. त्याचवेळी ही  गरज भागवण्यास शासकीय दुध योजना असर्मथ ठरत आहे.  बुधवारी दिवसभर इतर जिल्हा दुध संस्थांशी संपर्क साधल्यानं तरही तेथून पुरवठा होण्याची शक्यता मावळली. त्यामुळे संपूर्ण  जिल्ह्यात खासगी दुध उत्पादक संस्थांना बाजार खुला राहणार  आहे.अकोला जिल्ह्यातील दुध उत्पादक संस्थांकडून उत्पादनात वाढ  झाली असताना त्यांच्याकडून दुध घेण्यावर जिल्हा दुग्ध विकास  अधिकारी कार्यालयाने निर्बंध लावले आहेत. तर त्याचवेळी  यवतमाळ, अमरावती येथील शिल्लक राहणारे दुध अकोला  जिल्ह्यात आणून विकले जात असल्याची परिस्थिती आहे. हाच  प्रकार लक्षात घेता उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाची मागणी  वाढणार आहे. हा अंदाज घेता जिल्हा दुग्ध विकास अधिकारी  दुधाने यांनी लगतच्या जिल्ह्यांतून दुध पुरवठा होण्यासाठी संपर्क  केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याच जिल्ह्याने  पुरवठा करण्याबाबत होकार दिलेला नाही. त्यामुळे शासकीय  दुग्ध संस्थेतून दुध मिळण्याची प्रतिक्षा करणारांना उद्या दुधापासून  वंचित राहावे लागणार आहे. त्याचवेळी खासगी उत्पादक संस् थांच्या दुधाची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. जिल्ह्यात शासकीय दुध डेअरीकडून दररोज किमान १६00  लिटर दुधाचा पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हा दुग्ध  विकास अधिकार्‍यांनी दिली. प्रत्यक्षात त्यामध्ये प्रचंड तफावत  असल्याची माहिती आहे. अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील दुग्ध  उत्पादक सहकारी संस्थांकडून संकलित केलेले केवळ ७00 ते  ८00 लिटर दुधाचे वाटपच दररोज केले जाते. त्यामध्ये यव तमाळ, अमरावती जिल्ह्यातून शिल्लक राहिलेले दुध अकोला  जिल्ह्यात विक्रीसाठी बोलावले जाते, हा प्रकार जिल्ह्यात  दैनंदिन झाला आहे. उद्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मागणीत वाढ  होत असताना इतर जिल्ह्यातील दुध अकोल्यात विक्रीसाठी  येणार नाही. त्याचवेळी जिल्ह्यातील संस्थांच्या दुधाचेही  संकलन केले जात नाही, हा गंभिर प्रकार सुरू आहे. त्यातून  शासकीय दूधावर विश्‍वास ठेवणार्‍या ग्राहकांना त्यापासून वंचित  राहण्याची वेळ आली आहे.