शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडा कायमच; रुग्णांची चिठ्ठीवर बोळवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:46 IST

गत वर्षभरापासून असलेला औषधांचा तुटवडा अजूनही कायमच असून, बाह्य उपचार कक्षात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना सर्रास चिठ्ठ्या लिहून बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

ठळक मुद्दे स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांनी धुमाकूळ घातल्याने सर्वोपचारमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. औषधांचा साठा कमी असल्याने अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जात आहे.रुग्णालय प्रशासनाकडे फक्त ३ कोटी ८७ लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत.

अकोला : शहरासह जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला लागलेल्या औषधांच्या तुटवड्याचे ग्रहण सुटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. गत वर्षभरापासून असलेला औषधांचा तुटवडा अजूनही कायमच असून, बाह्य उपचार कक्षात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना सर्रास चिठ्ठ्या लिहून बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे गरीब रुग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.सर्वोपचार रुग्णालयात संपूर्ण अकोला जिल्हा, लगतचा वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून रुग्ण उपचारासाठी येतात. येथील ओपीडीमध्ये दिवसाकाठी किमान १२०० ते १४०० रुग्णांची नोंद होते. आंतररुग्ण विभागातील विविध वॉर्डांमध्येही मोठ्या संख्येने रुग्ण भरती आहेत. सध्या डेंग्यू, स्क्रब टायफस या कीटकजन्य व स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांनी धुमाकूळ घातल्याने सर्वोपचारमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. येथे येणाºया रुग्णांच्या तुलनेत औषधांचा साठा कमी असल्याने अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जात आहे.आठ कोटींपैकी निम्माच निधी मिळाला!शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधे व साहित्य खरेदी तसेच इतर बाबींसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाठपुरावा करून मागच्या महिन्यात आठ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यापैकी रुग्णालय प्रशासनाकडे फक्त ३ कोटी ८७ लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. यामधून औषध पुरवठादारांची जुनी देयके देण्यात आली आहेत.दोन आठवड्यात परिस्थिती सुधारेल!शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर औषधांची खरेदी होऊन परिस्थिती सुधारेल, असे वाटले होते; परंतु निधी मिळून तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना छेडले असता, येत्या दोन ते तीन आठवड्यात औषध पुरवठ्याची स्थिती सुधारेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटलmedicinesऔषधं