शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधांची वानवा; महापालिकेचा ‘फ्लॉप शो’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:14 IST

आठवडा उलटून गेला असला तरी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे महापालिकेचा शो फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.

अकोला: प्रभागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी महापालिकेची आहे. प्रशासनाने नियुक्त केलेले विविध विभागातील कर्मचारी नगरसेवकांच्या हातावर तुरी ठेवण्यात पटाईत झाल्यामुळे प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. मनपाच्या प्रशासकीय कारभारावर चारही बाजंूनी टीकेची झोड उठत असल्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांनी सारवासारव करण्याच्या उद्देशातून झोननिहाय बैठकीच्या माध्यमातून नगरसेवकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आठवडा उलटून गेला असला तरी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे महापालिकेचा शो फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.शहरवासीयांजवळून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याच्या बदल्यात महापालिका प्रशासनाने रस्ते, नाल्या, पथदिवे, पदपाथ, दैनंदिन पाणी पुरवठा तसेच साफसफाई आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त ठरते. मनपाच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या संजय कापडणीस यांच्या कालावधीत मूलभूत सुविधांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच भारिप-बमसंच्या नगरसेवकांपेक्षा खुद्द सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सत्ता असूनदेखील प्रशासनाला वारंवार सूचना केल्यानंतरही प्रभागातील समस्यांचा निपटारा न करता त्याकडे पाठ फिरविल्या जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांमधून केला जात आहे. प्रभागांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नाल्या, गटारे, सर्व्हिस लाइन घाणीने तुंडुंब साचल्या आहेत. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे साथीच्या आजारांनी अकोलेकर बेजार झाल्याचे चित्र आहे. त्याचा रोष नगरसेवकांवर व्यक्त केला जात आहे. या समस्यांकडे आयुक्तांकडून कानाडोळा केला जात असल्याने नगरसेवकांची मुस्कटदाबी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका