कुरूम (जि. अकोला): शासन मुलींना वाचविण्यासाठी विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी रुग्णवाहिकेत इंधन नसल्याने नवजात बालिकेला रुग्णालयात हलवित झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना कुरूम येथे शुक्रवारी रात्र घडली. कुरूम येथील सायना परवीन (३२) यांना १५ एप्रिल रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास प्रसू ितकळा सुरू झाल्या. पोटात दुखू लागल्याने तिच्या नातेवाइकांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मागविली; मात्र रुग्णवाहिकेत इंधन नसल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी धावपळ करून ऑटोरिक्षाची व्यवस्था केली; मात्र तोपर्यंत महिला घरीच प्रसूत झाली. रात्री २ वाजताच्या सुमारास तिला ऑटोरिक्षाने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर!
By admin | Updated: April 17, 2016 01:17 IST