शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:00 IST

अस्वच्छता आणि सांडपाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती आणि अस्वच्छतेमुळे वाढलेल्या माशांची संख्या साथरोग पसरविण्यास हातभार लावत असल्याचे वास्तव आहे; मात्र याकडे आरोग्य यंत्रणेचेच दुर्लक्ष होत आहे.

अकोला : सध्या वातावरणातील बदलांमुळे कीटकजन्य आजारांसह साथरोगाचाही धोका कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आणि सांडपाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती आणि अस्वच्छतेमुळे वाढलेल्या माशांची संख्या साथरोग पसरविण्यास हातभार लावत असल्याचे वास्तव आहे; मात्र याकडे आरोग्य यंत्रणेचेच दुर्लक्ष होत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये काही वॉर्ड परिसरात पाणी साचून आहे, तर येथील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छतादेखील करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या पाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती रुग्णांसाठी घातक ठरत आहे. डासांसोबतच अस्वच्छतेमुळे निर्माण झालेल्या माशांमुळे साथरोगाचाही धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रावर आहे. साठविलेल्या पाण्यासह वॉर्ड परिसरात साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे डासांची व माशांची उत्पत्ती वाढली असून, त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार सर्वांच्या निदर्शनास येत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे....तर कडक कारवाई हवी!बहुतांश लोक रुग्णालय परिसरात शिळे अन्न किंवा इतर कचरा टाकून मोकळे होतात; परंतु त्यापासून होणाºया आजारांचा विचार करीत नाहीत. कचरा टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर वॉच ठेवण्याची गरज आहे. कुठेही अस्वच्छता पसरविल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.‘डस्टबिन’ची संख्या वाढविण्याची गरज!सर्वोपचार रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात डस्टबिन आहेत; मात्र बहुतांश लोक उघड्यावरच कचरा किंवा शिळे अन्न टाकून मोकळे होतात. ही बाब लक्षात घेता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होते, अशा ठिकाणी डस्टबिनची संख्या वाढविण्याची गरज आहे.रिक्त पदांमुळे प्रशासन हतबलशासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीची पदे रिक्त असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम स्वच्छतेवर होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय