शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

रेल्वे मार्गाने तेलंगणाकडे पायी निघालेले मजूर अकोल्यात आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:09 IST

पजीविकेचे कोणतेच साधन नाही आणि उपासमार सहन होत नसल्याने अखेर या सर्व मजुरांनी गावाकडे जाण्याचा रस्ता धरला.

ठळक मुद्देरात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास हे मजूर उगवा येथून निघाले. लहान मूल, गर्भवती महिला सोबत असल्याने त्यांना अकोल्याला येता येता पहाट उजळली.विसाव्यासाठी ते येथील शिवनेरी विद्यार्थी वसतिगृहाच्या परिसरात थांबले.

- राजरत्न सिरसाट  अकोला: रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी कंत्राटदाराने आणलेले तेलंगणा राज्यातील ३० ते ३२ मजूर रोजी रोजगार संपल्याने बुधवारी रात्री उगवा या गावाकडून तेलंगणाकडे पायीच निघाले होते. रेल्वे मार्गाने रात्रभर १२ किलोमीटरचा प्रवास करून हे सर्व मजूर चालत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या शिवनेरी वसतिगृह येथे पहाटे पोहोचले. सकाळी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्यावर या मजुरांना आता अकोल्यातच निवारा देण्यात आला आहे. 

अकोला ते अकोट रेल्वे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदाराने वारंगल जिल्ह्यातील एका खेड्यात राहणाºया ३० ते ३२ मजुरांना कामासाठी आणले होते; परंतु कोरोनाचा जगभर वाढता प्रसार आणि भारतातही हा विषाणू पसरत असल्याने त्याला रोखण्यासाठी २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. २१ दिवसांची ही टाळेबंदी १४ एप्रिल रोजी संपणार होती; परंतु या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याने पुन्हा ३ मेपर्यंत टाळेबंदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  एकतर कंत्राटदार सोडून गेला आणि मजुरांकडे जो काही पैसा होता तोही संपला. काही दिवस त्यांनी शेतकºयांनी सोडून दिलेल्या शेतातील फरदड कापूस विकून अर्धपोटी कसे तरी दिवस काढण्याचा प्रयत्न केला. आता उपजीविकेचे कोणतेच साधन नाही आणि उपासमार सहन होत नसल्याने अखेर या सर्व मजुरांनी गावाकडे जाण्याचा रस्ता धरला. यात दोन वर्षातील मुलांसह एक सहा महिन्यांची गर्भवती महिला हिचाही समावेश होता. रात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास हे मजूर उगवा येथून निघाले. लहान मूल, गर्भवती महिला सोबत असल्याने त्यांना अकोल्याला येता येता पहाट उजळली. रेल्वे मार्ग डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यपीठाजवळून जात असल्याने विसाव्यासाठी ते येथील शिवनेरी विद्यार्थी वसतिगृहाच्या परिसरात थांबले. कृ षी विद्यापीठाच्या अधिकाºयांना ही माहिती प्राप्त होताच त्यांनी येथील नळ सुरू केले. शिवर येथील युवकांनी त्यांना खिचडी आणून दिली. हे सर्व तेलुगू भाषा बोलत असल्याने इतरांना कळत नाही. मिहान तोटावार यांना ही भाषा समजत असल्याने त्यांनी या मजुरातील प्रमुख याच्यासोबत बोलून त्यांची व्यथा जाणून घेतली. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.

गर्भवती महिलेला इंजेक्शनचे दोन डोस मिळाले नाहीत!यात एक गर्भवती महिला आहे. तिला या अवस्थेत देण्यात येणारे दोन महिन्यांचे इंजेक्शन मिळाले नाही. तिला दीड ते दोन वर्षांचे बाळ आहे.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punajabrao Deshmukh Agriculture Collegeपंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयTelanganaतेलंगणाLabourकामगार