शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाला ‘क्रीमी लेयर’च्या सवलतीपासून वंचित ठेवणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:55 IST

कुणबी समाजाला ‘क्रीमी लेयर’च्या सवलतीपासून वंचित ठेवणे अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकरराव गणगणे यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांची परखड प्रतिक्रिया

अकोला : महाराष्ट्रामध्ये ओबीसीसह अठरापगड जाती असून, त्यामध्ये कुणबी हा प्रामुख्याने शेतकाम करण्यात गणला जातो. शेतकरी वर्गात मोडणाºया समाजाला महाराष्ट्र शासनाने ‘क्रीमी लेयर’ सवलतीमधून वगळण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा या समाजावर अन्याय होईल. कुणबी समाजाला ‘क्रीमी लेयर’च्या सवलतीपासून वंचित ठेवणे अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकरराव गणगणे यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गात मोडतो. कुणबी समाजाला ‘क्रीमी लेयर’मधून वगळण्याची माहिती येत आहे. राज्य शासनाच्या मागासवर्गीय आयोगाने तसे पत्रक काढल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून उमटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समिती कुणबी समाजाच्या ‘क्रीमी लेयर’विषयक मागणीसंदर्भात सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शासनाने पाहिले पाहिजे. तसे न झाल्यास कुणबी समाजावर अन्याय होईल. या निर्णयामुळे कुणबी समाजातील विद्यार्थी शासकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक न्यायापासून वंचित राहतील. महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत ‘क्रीमी लेयर’ शिथिलीकरणाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येईल. कुणबी समाजाने आंदोलन छेडावे, त्यांना आमचा पाठिंबा आहे, असेही गणगणे यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी अकोला महानगर संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव हुरपडे, गोपाल भिरड, चंद्रकांत सावजी, पुष्पा गुलवाडे, सुमन भालदाने, अनंत बमाडे, मनीष हिवराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Politicsराजकारण