शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावत’च्या विरोधात क्षत्रिय महासभेची निषेध रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:03 IST

 लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या अकोला जिल्हा युवा शाखेच्यावतीने शेकडो राजपूत युवकांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता निषेध रॅली काढली आणि चित्रपटगृह संचालकांना निवेदन दिले. अ.भा.क्ष. महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजय सेंगर, युवा प्रदेश अध्यक्ष मनोजसिंह बिसेन, विदर्भ उपाध्यक्ष विनोदसिंह ठाकूर, विदर्भ प्रदेश कार्यकारिणी मार्गदर्शक बादलसिंह ...

ठळक मुद्देअखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या निषेध रॅलीत शेकडो राजपूत युवकांनी

 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या अकोला जिल्हा युवा शाखेच्यावतीने शेकडो राजपूत युवकांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता निषेध रॅली काढली आणि चित्रपटगृह संचालकांना निवेदन दिले. अ.भा.क्ष. महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजय सेंगर, युवा प्रदेश अध्यक्ष मनोजसिंह बिसेन, विदर्भ उपाध्यक्ष विनोदसिंह ठाकूर, विदर्भ प्रदेश कार्यकारिणी मार्गदर्शक बादलसिंह ठाकूर,राजूसिंह ठाकूर, युवा शाखेचे मार्गदर्शक संजयसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आली.क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने कौलखेड चौकापासून चित्रपटगृहापर्यंत रॅली काढली. या दरम्यान आ. गोवर्धन शर्मा आणि आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी राजपूत समाजाची भावना लक्षात घेता पूर्ण सर्मथन दिले. युवा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सूरजसिंह ठाकूर, कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजकमलसिंह चौहान, महानगर अध्यक्ष आशिषसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी या निषेध रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विक्रम (छोटू) गावंडे, सिद्धार्थ वरोटे, नगरसेवक, सुजितसिंह ठाकूर, धीरज गौतम, नवज्योत, बघेल, मनीष बिसेन, संदीप ठाकूर, निखिल ठाकूर, राकेशसिंह बैस, दिनेश ठाकूर, पप्पू ठाकूर, कपिल गौतम, आकाश ठाकूर, आनंद चौहान, सौरभ चौहान, हर्षल गौतम, गौरव चौहान, राहुल ठाकूर, गोपाल ठाकूर, सौरभ ठाकूर, छोटू ठाकूर, वीरेंद्र ठाकूर, विश्‍वजित राजपूत, प्रेम राजपूत, महेंद्र राजपूत, प्रतीक राजपूत, शिवा ठाकूर, मयूर ठाकूर, अजय ठाकूर, वीरेंद्र बघेल, हिरा ठाकूर, गुड्ड ठाकूर, शुभम ठाकूर उपस्थित होते. 

आज कडेकोट पोलीस बंदोबस्त‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होणार असून, त्यासाठी जिल्हय़ात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचीही करडी नजर राहणार असून, कुठेही अनुचित प्रकार होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. अकोला शहरातील तीन चित्रपटगृहांसह अकोट व मूर्तिजापूर येथील चित्रपटगृहात पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे; मात्र अकोल्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल की नाही, यासंदर्भात स्पष्ट माहिती नाही. दरम्यान या सर्व चित्रपटगृहासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार  असून, छायाचित्रण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ात कुठेही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

‘पद्मावत’ संदर्भात पोलिसांचा अँक्शन प्लॅन तयार असून, प्रत्येक ठिकाणी छायाचित्रण करण्यात येणार आहे. दर्शकांनी शांततेत हा चित्रपट पाहण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच आंदोलकांनी आंदोलन केल्यास त्यांच्यावर  कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- एम. राकेश कलासागर,पोलीस अधीक्षक, अकोला.

टॅग्स :Padmavatपद्मावतAkola cityअकोला शहर