शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोठडी बाजार चौकात गणेशभक्तांवर सौम्य लाठीमार!

By admin | Updated: September 16, 2016 03:14 IST

भाविकांच्या धावपळीत दोन चिमुकले किरकोळ जखमी

अकोला, दि. १५- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशभक्त धावत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे उडालेल्या धावपळीमुळे दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास कोठडी बाजारनजीकच्या चौकात घडली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गणेशभक्त धावत जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस कर्मचारी त्यांना शांततेने जाण्यासाठी सांगत होते; परंतु गणेशभक्त ऐकत नव्हते. शेकडो गणेशभक्त अचानक धावत सुटल्याने गर्दीतील नागरिक घाबरून गेले आणि तेसुद्धा रस्त्याने पळायला लागले. चेंगराचेगरीची शक्यता असल्याने पोलिसांनी धावणार्‍या काही गणेशभक्तांवर सौम्य लाठीमार करून त्यांना चौकाच्या बाहेर काढले. त्यामुळे उडालेल्या धावपळीत दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तात्पुरता उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. ताजनापेठ चौकातील पोलीस चौकीमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, शांतिदूत समितीचे अध्यक्ष अँड. सुधाकर खुमकर, अनिल माहोरे व डॉ. आशा मिरगे आदी उपस्थित होते. नारे देणारा युवक ताब्यात ताजनापेठ चौकातील मोठय़ा मशीदजवळ चिथावणीखोर नारेबाजी करणार्‍या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा युवक धार्मिक वातावरण कलुषित होईल. अशा पद्धतीने मशीदजवळ नारेबाजी करीत होता. या ठिकाणी तैनात रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष माकोडे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी तातडीने युवकाला ताब्यात घेतले. मुस्लीम बांधवांनी केले गणेशभक्तांचे स्वागतमोठय़ा मशीदजवळ गणेशभक्तांची मिरवणूक येताच, मुस्लीम बांधवांनी गणेशभक्तांचे पुष्पहाराने स्वागत केले आणि एकमेकांना आलिंगन देत राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोख्याचा संदेश दिला. गणेश भक्तांनीसुद्धा मुस्लीम बांधवांचे पुष्पहार घालून स्वागत केले.