शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अकोला जिल्ह्यातील १६३२१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान विज्ञान परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:38 IST

१४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १८९ केंद्रावर ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात आली.

अकोला : जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व तालुका विज्ञान अध्यापक मंडळातर्फे शनिवार, १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १८९ केंद्रावर ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील १६ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.विद्यार्थ्यांची एनटीएसई परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, या उद्देशाने ही परीक्षा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. परीक्षेमध्ये बुद्धीमत्ता चाचणी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य ज्ञान व पर्यावरण या विषयावर ५० गुणांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ६० मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यामध्ये स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीसीएसई आदी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. ही परीक्षा इयत्ता ५ व ६ ‘अ’ गट, इयत्ता ७ व ८ ‘ब’गट आणि इयत्ता ९ व १० ‘क’ गट अशा तीन गटातून घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात तालुका स्तरावर ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक गटातून १३५ विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार जिल्हा स्तरावर निवड करण्यात येईल. यातील गुणवत्तेनुसार इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यम अशी गुणवत्ता यादी तयार करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल. त्यामधून प्रत्येक गटातून पाच विद्यार्थ्यांची निवड होईल. त्यांना एकदा ५०० रुपये शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. शनिवारी झालेल्या परीक्षेवेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, विज्ञान पर्यवेक्षक गजानन लाजुळकर, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, प्राचार्य माधव मुनशी यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली.तालुकानिहाय केंद्र व विद्यार्थीतालुका - परीक्षा केंद्र - विद्यार्थीअकोला (शहर) - ३७ - ४९०५अकोला (ग्रामीण) - १४ - ७६८पातूर - २८ - १९०५अकोट - २९ - २६८०तेल्हारा - २० - २०२८बाळापूर - १६ - १५६२मूर्तिजापूर - २९ - १५६३बार्शीटाकळी - १६ - ९१०

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा