शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

किशोर खत्री हत्याकांडाची आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:29 IST

अकोला : शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर  खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम सोमवारी  विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर  झाले. मात्र एका साक्षीदाराची प्रकृती ठिक नसल्याने तसेच  तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.  या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम साक्षीदार तपासणार आहेत.  त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे. 

ठळक मुद्देप्रसिद्ध विधिज्ञ अँड. निकम मांडणार बाजू 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर  खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम सोमवारी  विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर  झाले. मात्र एका साक्षीदाराची प्रकृती ठिक नसल्याने तसेच  तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.  या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम साक्षीदार तपासणार आहेत.  त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे.  खोलेश्‍वर परिसरात निमार्णधीन असलेल्या बालाजी मॉलच्या  आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर  २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच  धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे  एकच खळबळ उडाली होती. हत्याकांडाची माहिती मिळताच  वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी  जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले हो ते. दरम्यान, खत्री हत्याकांडप्रकरणी अँड. उज्ज्वल निकम यांची  नियुक्ती करण्यात आली असून, चार टप्प्यांमध्ये ते सुनावणीसाठी  हजर राहणार असल्याची माहिती आहे. यासाठी अँड. निकम  रविवारी रात्रीच अकोल्यात दाखल झाले असून, सोमवारी ते  साक्षीदार तपासणार होते, मात्र आता ही सुनावणी मंगळवारपासून  होणार आहे.

या आरोपींचा आहे समावेशबिल्डर किशोर हत्याकांडप्रकरणी रणजितसिंह चुंगडे, रुपेश  चंदेल, जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहरे हे आरोपी  आहेत. हत्याकांडानंतर यामधील जस्सी, चुंगडे फरार झाले होते,  मात्र दोन्ही आरोपींची आर्थिक नाकेबंदी केल्यानंतर, या आरो पींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती.

निर्माणाधीन मॉलची पाहणीज्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री  यांची हत्या करण्यात आली होती, त्या निर्माणाधीन मॉलची  विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी  रात्री पाहणी केली. चित्रा टॉकीजच्या ंजागेवर हा मॉल उभा  असून, त्यामागील जागेचीही निकम यांनी पाहणी केली.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा