शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

विदर्भातील पिकांवर किडींचे आक्रमण सुरू च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:36 IST

अकोला : विदर्भात पाऊस आला; पण काही भागात त्याचा जोर कमी असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. मान्सूनपूर्व कपाशी गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. या अळीचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, स्पोडोप्टोरा व हेलीओकर्पा नावाच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व विषम परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे.

ठळक मुद्देकीटकनाशकांचा खर्च वाढलागुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात पाऊस आला; पण काही भागात त्याचा जोर कमी असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. मान्सूनपूर्व कपाशी गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. या अळीचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, स्पोडोप्टोरा व हेलीओकर्पा नावाच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या सर्व विषम परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने तब्बल ४0 ते ५0 दिवस उशिरा शेतकर्‍यांना पेरणी करावी लागली. तुरळक पावसाच्या भरवशावर काही भागातील पिके तरली आहेत. वाढणारे तापमान आणि मध्येच निर्माण होणारे ढगाळ वातावरण पिकांवरील विविध किडींना पोषक ठरत आहे. मान्सूनपूर्व कपाशीवर पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव दिसत असून, गुलाबी बोंड अळीने चाल केली आहे. नियमित खरीप हंगामातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींनी आक्रमण केले असून, फुलकिडेही उदयास आले आहेत.

कापूस बोंडाची झाली डोमकळी!मान्सूनपूर्व पेरणी केलेल्या कपाशीवर या अळीचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पात्या आणि फुलांवर आले. या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यास कपाशीची फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, यालाच डोमकळी म्हटले जाते. कपाशीची बोंडे धरायला सुरुवात झाली, की या अळीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त हिरव्या बोंडामध्ये होतो. 

काळजी घ्या! कोरडवाहू कपाशीमध्ये हा प्रादुर्भाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हिरव्या बोंड अळीमध्ये होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रतिकूल परिणाम होऊन कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ्या रुईमधून छिद्र करू न सरकी खात असल्याने रुईची प्रत व सरकीतील तेलाचे प्रमाण खालावते, तसेच बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

 मान्सूनपूर्व कपाशीवर काही ठिकाणी पांढरी माशी आली असून, नियमित खरीप हंगामातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळी व रस शोषण करणार्‍या कि डींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, तसेच सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा व हेलीओकर्पा आला आहे. या किडींचा बंदोबस्त एकीकृत व्यवस्थापन कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी दररोज शेताचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. - डॉ. धनराज उंदिरवाडे,  विभाग प्रमुख, कीटकशास्त्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.-