शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पावसाच्या अंदाजानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 13:49 IST

शेतकऱ्यांनी त्या अंदाजानुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

अकोला: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यातील पावसाचे प्रमाण पाहता १५ जुलैपर्यंत पेरणीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पीक पेऱ्यात होणाºया बदलासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. शेतकऱ्यांनी त्या अंदाजानुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी माहिती दिली.येत्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी सर्व वाणांचे बियाणे मिळून ६४२३१ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. बीटी कापसाच्या ७.२० लाख पाकिटांसह ८४९९० मे. टन रासायनिक खतांच्या मागणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यापैकी महाबीजकडे ३६५०३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली जाणार आहे.खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांच्या मागणीचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या पीक पेºयानुसार पेरणी झालेले क्षेत्र, त्यासाठी लागणारे बियाणे, खतांची मागणी कंपन्या, महामंडळ व शासनाकडे करण्यात आली आहे.खरीप ज्वारीच्या पेºयात वाढ गृहीत धरून येत्या वर्षासाठी १६८८ क्विंटल ज्वारी बियाण्याची मागणी होणार आहे. त्यापैकी महाबीजकडे १२०० क्विंटल बियाण्याची मागणी आहे. बीटी कापूस पेरणीसाठी विविध कंपन्यांकडून ७ लाख २० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये बीजी-१, बीजी-२ प्रकारातील बियाण्यांचा समावेश आहे. सोयाबीनचे ४९५०० क्विंटलऐवजी आता ५५९२० क्विंटल बियाणे महाबीजकडून मिळणार आहे. तुरीचे ३९३५ क्विंटल बियाणे मागविण्यात आले. मूग बियाण्याची २४४५ क्विंटल मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही मागणी घटली आहे. शेतकºयांकडे गतवर्षीचे शिल्लक बियाणे वापराच्या दरानुसार घट किंवा वाढ ठरविली जाते. त्यानुसार उडिदाचे बियाणे १९६६ क्विंटल लागणार आहे. त्यामध्येही घट झाली असून, गतवर्षी ती मागणी २५०७ क्विंटल होती. बाजरी- ५ क्विंटल, मका-७५ क्विंटल, सूर्यफूल-३ क्विंटल, तीळ-१४ क्विंटल, संकरित कपाशी-४ हजार क्विंटल, सुधारित कपाशी-६०० क्विंटलची मागणी करण्यात आली आहे.- जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणीकृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी लागणाºया प्रमाणात बियाण्यांची मागणी करण्यात आली.- महिन्यानुसार खतांची मागणीखरीप हंगामाच्या पेरणीपासून त्यापुढे लागणाºया महिनानिहाय वापरासाठी खतांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये एप्रिल-१०१९७ मे. टन, मे-११८९९, जून-१८६९८, जुलै-१७८४८, आॅगस्ट- १६१४९, सप्टेंबर-१०१९९ मे. टन मिळून ८४९९० मे. टन खतांची मागणी आहे.- खतांच्या प्रकारानुसार नियोजन (मे. टन)प्रकार मागणीयुरिया २४१९०डीएपी १४७५०एमओपी ४६९०एसएसपी १७०१९एनपीके २४३४१

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीAkola ZPअकोला जिल्हा परिषदFarmerशेतकरी