शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चौघा आरोपींना घेऊन खदान पोलीस नाशिकला रवाना!

By admin | Updated: November 18, 2016 02:14 IST

नोटा बदलून देण्याचे प्रकरण; आरोपींकडून ५0 हजारही वसूल करणार!

अकोला, दि. १७- चलनातून बंद करण्यात आलेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या बदल्यात शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल देण्याचे आमिष दाखविणार्‍या चार आरोपींना घेऊन खदान पोलिसांची चमू तपासासाठी नाशिकला रवाना झाली आहे. या ठिकाणी पोलीस आणखी काही लोकांची चौकशी करणार आहेत, तसेच तक्रारकर्त्याकडून आरोपींनी घेतलेले ५0 हजार रुपयेसुद्धा पोलीस वसूल करणार असल्याची माहिती आहे. रणपिसे नगरात राहणारे दादाराव वारके यांना १५ नोव्हेंबर रोजी धुळे येथील रहिवासी ज्ञानेश्‍वर पाटील, खामगाव येथील अनिल हिरोळे आणि बाळापूर येथील देवा हिवराळे आणि रवी नाईक यांनी चलनातून बंद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपये असलेल्या ५0 हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १00 रुपयांच्या नोटांचे १0 बंडल देण्याचे आमिष दाखविले. दादाराव वारके आरोपींच्या आमिषाला बळी पडले आणि त्यांनी आरोपींच्या सांगण्यानुसार ५0 हजार रुपयांच्या नोटा कारागृहासमोरील एका दुकानावर आणून दिल्या. त्यानंतर आरोपींनी त्यांना रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वर बोलावून त्यांच्या हातात १00 रुपयांच्या बंडलामध्ये ३३ नोटा आणि उर्वरित नोटांच्या आकाराचे कागद दिले; परंतु स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींना अटक केली. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास खदान पोलिसांकडे देण्यात आला. नोटा बदलून देण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे हे नाशिक येथून असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. त्यामुळे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात खदान पोलीस आरोपींना घेऊन नाशिकला रवाना झाले आहेत. या ठिकाणी पोलीस नाशिक येथील काही लोकांची चौकशी करणार आहेत. तसेच आरोपींनी तक्रारकर्ते दादाराव वारके यांच्याकडून घेतलेले ५0 हजार रुपयेसुद्धा पोलीस जप्त करणार आहेत.