शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील भाजीबाजारात शासनाच्या आदेशाला ‘खो’

By admin | Updated: August 5, 2016 00:45 IST

अडत्यांची मुजोरी शेतक-यांच्या मुळावर!

नाना हिवराळे खामगाव (जि. बुलडाणा)- शेतमाल व भाजीपाला अडतमुक्त करण्यात आला असला, तरी खामगावच्या भाजीबाजारात मात्र अडत्यांची मुजोरी कायम आहे. येथील भाजी बाजारात शेतकर्‍यांकडूनच १0 टक्के अडत घेतली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमालावरील अडत ही शेतकर्‍यांकडून न घेता ती व्यापार्‍यांकडून घ्यावी, असा आदेश शासनानेच दिला आहे. तसेच भाजीपाला विक्रीवरील अडतही व्यापार्‍यांकडून घेण्याबाबत आदेश दिला आहे. शासनाच्या या आदेशाविरुद्ध व्यापार्‍यांकडून बाजार समितीचे व्यवहार तीन वेळा बंद ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र येथे शेकडा १0 टक्के दराने शेतकर्‍यांकडून अडत कपात करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हमाली व इतर खर्चही शेतकर्‍यांकडूनच वसूल करण्यात येत आहे. खामगाव ही बुलडाणा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथे जिल्हाभरातून नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीस येतो. भाजीपाला हे नियमनमुक्त असतानाही खामगावात १0 टक्के दराची अडत शेतकर्‍यांकडून कपात करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये ताराजी व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांना दिली जाते कच्ची पावतीभाजीबाजारात सध्या शेतकर्‍याला अडत दुकानाच्या परवान्याची पावती न देता कोर्‍या पावतीवर हिशेब लिहून दिला जात आहे. या हिशेबामध्ये १0 टक्के अडत कपातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच हमाली व इतर खर्चही कपात करण्यात आला आहे. याबाबत शेतकर्‍यांना विचारणा केली असता नेहमीच शेतमाल विकायला आणावा लागतो. त्यामुळे अडत्यांशी वैर नको, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून येत आहे. -"शासनाच्या अध्यादेशानुसार भाजीपाला विक्री करताना अडत घेता येत नाही. अडत घेणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे येण्याची गरज आहे. अशा व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकर्‍याचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल."- एम.ए. कृपलानीसहायक निबंधक, खामगाव.