शेगाव, दि. २0- रस्ते चौपदरीकरणांतर्गत शेगाव-खामगाव या १६ कि.मी. अंतराचा राज्यमार्ग आता चौपदरीकरणाऐवजी तिहेरी मार्ग होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या मार्गावर पायी दिंड्यांना शेगाव येथे जाण्यासाठी खामगाववरून शेगावपर्यंत विशेष पालखी मार्ग करण्यात येणार आहे. रस्ते प्राधिकरण विभागाने केलेल्या या सर्वेक्षणात चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेली वाहतूक या रस्त्यावर नसल्याचा निर्वाळा निरीक्षक समितीने दिल्यानंतर हा मार्ग चौपदरीकरणाऐवजी आता तिहेरी मार्ग होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
खामगाव-शेगाव मार्ग होणार तीन पदरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 02:43 IST