शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

जातीभेद दूर ठेवा - शुकदास महाराज

By admin | Updated: January 14, 2015 00:31 IST

हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात शुकदास महाराज यांचे अवाहन.

हिवराआश्रम (): भारत ही आपली माता आहे. आपले पालन पोषण करणारी, आपल्याला जन्म व अस्तित्व देणार्‍या एकाच मातेच्या पोटी जन्माला येणार्‍या पुत्रांचे आपसात बंधुत्वाचे नाते असते. आपण कोण त्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे असलो तरी नात्याने बांधव लागतो. म्हणून सर्वांंनी मतभेद, पंथभेद, जा तीभेद बाजूला ठेवून बंधुत्वाचे नाते जोपासावे असे विचार विवेकानंद आश्रमाचे संस्थापक शुकदास महाराज यांनी व्यक्त केले. स्थानिक विवेकानंद आश्रमात १२ जानेवारी रोजी विवेकानंद जयंती महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी आपल्या आशिर्वचनातून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांची उपस्थि ती होती. पुढे बोलतांना शुकदास महाराज म्हणाले की, विवेकानंद विचारांचे आश्रम ही एकमेव धार्मिक संस्था अशी आहे जेथे विवेकानंदांच्या जयजयकारासोबत भारत माता की जय हा जयघोष केल्या जातो. प्रत्येकाला त्याच्या आवडी निवडीनुसार धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य हवे. स्वामी विवेकानंद म्हणत प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र धर्म असला तरी चालेल कारण प्रत्येकाचा स्वभाव, प्रकृती, चिंतन एकसारखे नाही. धर्म त्याच्या उपासनेचा मार्ग ठरवील. परंतु या सर्वांंचा मिळून एक विश्‍वधर्म असावा, असे ते म्हणाले. संस्थेच्या ५0 वर्षाच्या कालखंडात जनसेवेसाठीच जगत आलो छोट्याशा कौलारु खोलीत सुरु झालेला आश्रम आज समाजाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी सोयी-सुविधा पुरवित आहे. येत्या वर्षात संस्था मुलींसाठी भव्य वसतीगृह बांधत असून, तुम्ही लेक वाचवा, मी तिला शिक्षण देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. संस्थेचे आरोग्य विषयक सेवा अखंडीत सुरु राहण्यासाठी आश्रमाने दिलेल्या जमिनीत शासनाचे ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच सुरु होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.