शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कबड्डी सामन्यांच्या आयोजनावरून अकोल्यात भाजपा, राष्ट्रवादीत रंगला ‘कबड्डी सामना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 02:00 IST

अकोला : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरात राज्यस्तरीय महापौर कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेवरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्याआड कबड्डीचा जोरदार सामना रंगल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकौलखेडमध्ये कबड्डी सामन्यांच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरात राज्यस्तरीय महापौर कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेवरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्याआड कबड्डीचा जोरदार सामना रंगल्याची माहिती आहे. कौलखेडमध्ये कबड्डी सामने आयोजित न करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी भाजपाला दिल्यामुळे ऐन गुलाबी थंडीत क्रीडा क्षेत्रातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्मिती व्हावी, या उद्देशातून महापालिकेतील सत्ता पक्ष भाजपाने नव्या क्रीडा धोरणावर अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आजवर मनपातील क्रीडा विभागाच्या माध्यमातून कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन न  झाल्यामुळे मागील काही वर्षांपासून या विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. ही बाब सत्ताधारी भाजपाच्या निदर्शनास येताच त्यांनी मनपाचे नवे क्रीडा धोरण तयार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे क्रीडा विभाग सक्रि य झाला आहे. व शहरात प्रथमच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी महापौर विजय अग्रवाल, नगरसेविका योगिता पावसाळे यांनी पुढाकार घेतला असून, अँमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ, अमरावतीकडून कबड्डी स्पर्धेची परवानगी मिळाल्याची माहिती आहे. भाजपाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कौलखेड परिसरात महापौर कबड्डी चषक स्पर्धेवर शिक्कामोर्तब करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकार्‍यांनी कौलखेडमध्ये कबड्डी सामने आयोजित न करण्याचा इशारा भाजपाला दिल्याची माहिती आहे. राकाँ पदाधिकार्‍यांमार्फत जानेवारी महिन्यात शहरात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय क बड्डी स्पर्धांची तारीख अद्याप निश्‍चित झाली नसताना राष्ट्रवादीने कौलखेड परिसरात होणारे सामने शहरात इतरत्र कोठेही हलविण्यासाठी मनपा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. 

अँमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भाची मंजुरीकबड्डी स्पर्धांच्या आयोजनासाठी अँमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ व स्थानिक कबड्डी असोसिएशन या दोघांपैकी एकाची मंजुरी क्रमप्राप्त ठरते. जानेवारी महिन्यात शहरात कोणतेही कबड्डी सामने नसल्यामुळे विदर्भ असोसिएशनने महापालिकेला सामन्यांसाठी मंजुरी दिल्याची  माहिती आहे.

क्रीडा स्पर्धांचे आयोजन भाजपाने केले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कबड्डी सामन्यांचे आयोजन कौलखेड परिसरातच होईल. क्रीडा क्षेत्राची आवड असणार्‍या सर्वांनी सामन्यांचा आस्वाद घ्यावा, दबावासमोर झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. -विजय अग्रवाल, महापौर.

टॅग्स :Akola cityअकोला शहरBJPभाजपा