शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कमी खर्च, कमी वेळेत न्याय मिळण्याची गरज- न्यायमूर्ती हक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 18:11 IST

शेतकऱ्यांना व जनतेला कमीत कमी खर्च व वेळेत न्याय कसा मिळेल, याकरिता चिंतन करणे आवश्यक असून, ही समस्या सोडविण्यासाठी न्यायदूत पुढे येणार आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश झेड. ए. हक यांनी केले.

मूर्तिजापूर : भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत. त्याचा लाभ गरीब, निराधार, दिव्यांग, वयोवृद्ध, अज्ञानी व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना घेता न आल्यामुळे ते आपल्या न्याय व हक्कांपासून वंचित राहिले. अशा लोकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना व जनतेला कमीत कमी खर्च व वेळेत न्याय कसा मिळेल, याकरिता चिंतन करणे आवश्यक असून, ही समस्या सोडविण्यासाठी न्यायदूत पुढे येणार आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश झेड. ए. हक यांनी केले.सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करून न्याय व मदत करण्याच्या दृष्टीने हायकोर्ट बार असोसिएशनच्या महत्त्वाकांक्षी न्यायदूत प्रकल्पाचे उद्घाटन भागदार भवन मूर्तिजापूर येथे ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती हक बोलत होते.उच्च न्यायालयाच्या वकिलांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून स्थानिक वकील बांधवांच्या मदतीने हाती घेतलेल्या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या वकील मंडळींनी सामाजिक बांधीलकी जोपासत साकारलेल्या संकल्पनेला मूर्तस्वरूप देत न्यायदूतद्वारा सुरू केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचेही न्यायमूर्ती झेड. ए. हक यावेळी म्हणाले. वकील मंडळींनी सुरू केलेले कार्य शासनाने व न्यायालयाने जबाबदारीने स्वीकारावे तसेच न्यायालयाकडे धाव न घेता सर्वसामान्य नागरिकांनी आपली प्रकरणे आपसात मिटवावी, असे आवाहनही न्यायमूर्ती हक यांनी यावेळी केले. यावेळी अ‍ॅड. अनिल किल्लोर, अ‍ॅड. प्रफुल्ल सुबाळकर, सचिव अ‍ॅड. विजय भोरांडे, अ‍ॅड. अतुल पांडे, अ‍ॅड. पवन पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला तहसीलदार राहुल तायडे, गटविकास अधिकारी गजानन अगर्ते, अजरअली नवाब, सुधाकर गौरखेडे, राजू वानखडे, देवीदास बांगड व इतर अनेक सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ते व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. गणेश खानझाडे यांनी केले. आभार अ‍ॅड. खुबाडकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर