शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फक्त अंगठा लावला आणि कर्जमाफःशेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:47 IST

पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळाला.

अकोला :  फक्त आधार नंबर तपासला बायोमेट्रिक अंगठा लावला, आणि कर्जमाफ झाले. फक्त एकाच फेरीत हे काम झाले, त्याबद्दल शासनाचे मनापासून धन्यवाद, अशा शब्दात शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती आणि कर्जमुक्तीच्या साध्या सोप्या प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळाला. तशा याद्या सोमवारी (दि.२४) जाहीर झाल्या होत्या.  दुसऱ्यादिवशीही देगाव ता. बाळापूर आणि गोरेगाव ता. अकोला येथील पात्र लाभार्थी आपले आधार क्रमांक व बायोमेट्रीक प्रमाणिकरणासाठी जमले होते. अगदी सोप्या प्रक्रियेने माफ होणारे कर्ज याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.गोरेगाव खु. येथील मधुकर बळीराम वास्कर यांचे ३१ हजार १५६ रुपयांचे कर्ज माफ झाले. ते म्हणाले की, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कर्जमुक्तीचा शब्द पाळला. त्यामुळे आम्ही सारेच शेतकरी आनंदीत आहोत. इथं येऊन केवळ आमचे अंगठे मशिनवर ठेवले, कर्जाची रक्कम तपासली आणि लगेच कर्ज माफी झाली. शासनाचे मनापासून आभार.तेजराव माणिक भामरे म्हणाले की, माझं यादीत नाव आलं हे मी पाहिलं, आधार क्रमांक, बँक पासबुक घेऊन इथं सोसायटीच्या ऑफिसला आलो. इथं माझा अंगठा बायोमेट्रिक स्कॅन झाला.आणि लगेच कर्जमाफीचा कागद प्राप्त झाला. इतकी सोपी ही प्रक्रिया असेल असं वाटलं नव्हत. सरकारने बोलल्याप्रमाणे करुन दाखवलं.आम्ही सारे शेतकरी त्यामुळे आनंदी आहोत.शेख रशिद शेख हुसेन म्हणाले की, माझी कर्जमाफी झालीय, आणि मला त्याचा काहीही त्रास झाला नाही. कर्जमाफीसाठी मी फक्त आजच आलो आणि आजच मला कर्जमाफी झाल्याचे पत्र लगेचच मिळाले. शासनाने वचन दिल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिली.नितेश भानुदास ढोरे रा. गोरेगाव यांची ७३ हजार ३६१ रुपयांची कर्जमाफी झाली. ते म्हणाले की शासनाने दिलेला शब्द पाळला. शिवाय ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की विचारता सोय नाही. शासनाने दिलेल्या या कर्जमुक्तीबद्दल आम्ही खुप समाधानी आहोत. केवळ अंगठा लावला आणि कर्जमाफ झालं, इतकी ही सोपी पद्धत आहे.निर्मला रामभाऊ गावंडे रा. गोरेगाव खु. या महिला शेतकरी म्हणाल्या की, माझी ८२ हजार ७५६ रुपयांची कर्जमाफी झाली, पण मला काहीच त्रास झाला नाही. फक्त अंगठा दिला आणि कर्जमाफ झालं. आमचं कर्जमाफ करण्याचा शब्द पाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार.गुणवंत श्रीराम ठोंबरे रा. गोरेगाव खु. या शेतकऱ्याची ६४ हजार ६४७ रुपयांची कर्जमाफी झाली. केवळ आधारकार्ड, बँक पासबुक आणले यादीतील नाव होतेच. लगेच बायोमेट्रिक अंगठा दिला आणि कर्जमाफीचा दाखला मिळाला.रामकृष्ण मनोहर सोनटक्के रा. देगाव ता. बाळापूर म्हणाले की, त्यांचे एक लाख ६८ हजार ६७१ रुपयांचे कर्ज माफ झाले. मोठा दिलासा मिळाला. अक्षरशः एका मिनीटात कर्ज माफ झाले. आधार क्रमांक दिला, बायोमेट्रिक अंगठा स्कॅन केला आणि लगेचच कर्जमाफी झाली.देगावचेच गजानन शामराव बेलसरे म्हणाले की, कोणत्याही प्रकारची पायपीट न करता ही कर्जमुक्ती झाली. माझं एक लाख १३ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. याबद्दल शासनाचे आभार.सौ.मनोरमा रमेश दाळू रा. देगाव या महिला शेतकरी म्हणाल्या की , माझे एक लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याबद्दल शासनाचे आभार.कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावांची याद्या पहिल्या टप्प्यात सोमवारी दि.२४ ला चाचणीसाठी जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील गोरेगाव ता. अकोला व देगाव ता. बोरगाव या दोन गावातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर तात्काळ त्यांच्या आधार क्रमांक , बँक खाते क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण सुरु झाले आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५६७ शेतकऱ्यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण झाली होती.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी