संतोष येलकर/ अकोला : तांत्रिक देखभाल-दुरुस्तीच्या कारणामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील गव्हर्मेंट रिसीप्ट सिस्टिम (ग्रास प्रणाली) बंद झाल्याने जिल्ह्यातील मालमत्ताविषयक खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे शनिवारी जिल्ह्यात खरेदी-विक्रीचा एकही व्यवहार होऊ शकला नाही. राज्य शासनाच्या ह्यग्रास प्रणालीह्णद्वारे दस्तऐवजाचे शुल्क तसेच जमीन, घर प्लॉट इत्यादी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारा तील शुल्काचा भरणा ऑनलाइन (ई-पेमेंट) द्वारे करण्यात येतो. परंतु, तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी १ ते ४ मे या कालावधीत ह्यग्रास प्रणालीह्ण बंद करण्यात आली आहे. ग्रास प्रणाली बंद असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयासह जिल्ह्यातील तालुका स्तरावर दुय्यम निबंधक कार्यालयात ह्यग्रास प्रणालीह्णद्वारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काचा ऑनलाइन भरणा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली. यासोबतच ई-पेमेंटची पडताळणी करण्याचे बंद झाले असल्याने, जिल्ह्यात जमीन, घर, प्लॉट इत्यादी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले. ग्रास प्रणाली बंद असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ऑनलाइन नोंदणी व मुद्रांक शुल्क स्वीकारण्याचे काम बंद आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या सुटीनंतर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी शनिवार, २ मे रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या नागरिकांना व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण न होताच रिकाम्या हाताने परतावे लागले. ग्रास प्रणाली बंद असल्याने शनिवारी जिल्ह्यात खरेदी -विक्रीचा एकही व्यवहार झाला नाही. दरम्यान सह जिल्हा निबंधकाशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक देखभाल -दुरुस्तीच्या कारणामुळे १ ते ४ मे या कालावधीत ग्रास प्रणाली बंद करण्यात आली असून, ५ मे पासून ही प्रणाली पूर्ववत कार्यान्वित होणार असल्याचे सांगीतले.
मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प
By admin | Updated: May 3, 2015 02:15 IST