शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या कार्यातून, विचारांतून प्रेरणा घेऊन न्यायदान करा - न्यायमूर्ती भूषण गवई

By नितिन गव्हाळे | Updated: December 9, 2023 22:31 IST

यंदा बाबासाहेबांच्या वकिली व्यवसायाला १०० वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कार्यातून, विचारांतून प्रेरणा घेऊन न्यायदानाचे कार्य पार पडले पाहिजे, असे मत दिल्ली सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांनी येथे व्यक्त केले. 

अकोला : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी न्यायालयाच्या उद्घाटन साेहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेने न्याय, समता व बंधुता यावर आधारित सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळालेले आहे. यंदा बाबासाहेबांच्या वकिली व्यवसायाला १०० वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कार्यातून, विचारांतून प्रेरणा घेऊन न्यायदानाचे कार्य पार पडले पाहिजे, असे मत दिल्ली सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांनी येथे व्यक्त केले. 

अकोल्यातील कौटुंबिक न्यायालय इमारतीच्या कोनशिला समारंभाचे उद्घाटन ९ डिसेंबर रोजी दुपारी न्या. भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती संजय मेहरे, न्यायमूर्ती यनशिवराज खाेब्रागडे, न्यायमूर्ती अभय वाघवासे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अद्वैत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश शुभदा ठाकरे, महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. मोतिसिंह मोहता, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रवीण तायडे उपस्थित होते. कार्यक्रमात अकोल्याचे सुपुत्र व चीफ जस्टिस ऑफ ओडिशाचे न्यायमूर्ती स्व. वल्लभदास मोहता यांच्या प्रतिमेचे अनावर करण्यात आले. तसेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांचा न्या. गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायधीश शुभदा ठाकरे यांनी केले. संचालन अमरावतीच्या क्षिप्रा मानकर यांनी, तर आभार बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. देवाशिष काकड यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश, विधिज्ञ, पक्षकार उपस्थित होते.

कुटुंबव्यवस्था जपण्याची गरजयावेळी न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी मार्गदर्शन करताना, यापूर्वी भाड्याच्या इमारतीतून कौटुंबिक न्यायालयाचा कारभार चालत होता. आता स्वतंत्र इमारतीतून कारभार होणार आहे. त्यामुळे कौटुंबिक दावे चालवताना संवेदनशील राहून सुसंवाद साधला पाहिजे, पण त्यापूर्वी हरवलेला सुसंवाद स्थापित करण्यात यश मिळाले पाहिजे, असे सांगत न्या. जवळकर यांनी न्यायदान, घटस्फोट होत राहतील, पण कुटुंबव्यवस्था जपणे महत्त्वाचे आहे. ते काम या इमारतीतून झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

प्रथमच आठ न्यायमूर्ती एकत्रअकोल्यात न्यायालयाशी संबंधित अनेक कार्यक्रम झाले, पण कधीही सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकाचवेळी एकत्र आले नाहीत. कौटुंबिक न्यायालयाच्या कोनशिला समारंभाला एकाचवेळी मंचावर आठ न्यायमूर्तींनी हजेरी लावली. हा क्षण अविस्मरणीय असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी याठिकाणी सांगितले. 

टॅग्स :Akolaअकोला