काशिनाथ मेहेत्रे / सिंदखेडराजा राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त आज उगवत्या सुर्याला साक्षीला ठेवून सकाळी ६ वाजता लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर जिजाऊंची थाटात महापूजा करण्यात आली. यावेळी माँ जिजाऊंच्या जयघोषाने मातृतिर्थ आणि राजवाडा दुमदुमून गेला.मातृतिर्थ राजवाड्यावर सुरुवातीला जिजाऊ माँ साहेबांच्या वंशज शिवाजी राजे देशमुख सौ. संगिता शिवाजी देशमुख, सौ. सुमनताई राजे जाधव यांच्या हस्ते जिजाऊंची महापूजा झाली. त्यानंतर मराठा सेवा संघातर्फे जिजाऊंचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य अरुण जाधव, राजु देशमुख, विठ्ठल जाधव, भास्कर जाधव, अँड.निशीकांत जाधव, मराठा सेवा संघ प्रदेश अध्यक्ष कामाजी पवार, सुभाषराव कोल्हे, अर्चना कोल्हे, सौ.जयश्रीताई शेळके, तहसिलदार सुनिल शेळके, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष वंदना मनोज आखरे, शितल शिवाजी तनपुरे, अश्वीनी राजेंद्र आढाव, जिजाऊसृष्टी अध्यक्ष दिलीपराव देशमुख, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष छाया दिलीप महाले, वनिता मोहन अरबट, डॉ.सविता दत्तात्रय बुरकूल, अंजली महेश पवार आदींनी जिजाऊंची महापूजा करुन अभिवादन केले. यावेळी मंगलमय वाद्य, गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत जिजाऊंचा जयघोष राजवाड्यावर दुमदुमला. मिठाईवाटप करुन २१ तोफांची सलामी देण्यात आली.
जिजाऊंच्या जयघोषाने दुमदुमले मातृतिर्थ !
By admin | Updated: January 12, 2015 23:28 IST