शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन नगण्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 15:43 IST

ज्वारीच्या उत्पादनाचे प्रमाण अगदीच नगण्य असून वाशिम वगळता अन्य एकाही बाजार समितीत ज्वारीची आवकच होत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन आणि रब्बी हंगामात हरभरा या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यातुलनेत अल्प दर मिळत असल्याने ज्वारीच्या उत्पादनाचे प्रमाण अगदीच नगण्य असून वाशिम वगळता अन्य एकाही बाजार समितीत ज्वारीची आवकच होत नसल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात कधीकाळी कापूस आणि ज्वारी ही पिकांचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जायचे. मात्र, तुलनेने मोठी बाजारपेठ उपलब्ध न होणे, अपेक्षित दर न मिळणे, विविध स्वरूपातील कीडरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन न मिळणे आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्हीही प्रमुख पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. त्याजागी खरीप हंगामात आता सोयाबिनचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जात असून त्यापाठोपाठ तूर, मुग, उडिद ही पिके घेतली जातात; तर रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांच्या उत्पादनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातुलनेत ज्वारीची लागवड झाल्याचे अभावानेच पाहावयास मिळत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा आणि मालेगाव या सहा प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी एकमात्र वाशिमच्या बाजार समितीत ज्वारीची नित्यनेम आवक होत आहे. असे असले तरी त्याचे प्रमाण दैनंदिन ५ ते १० क्विंटलपेक्षा अधिक नाही. सद्या ज्वारीला वाशिमच्या बाजार समितीमध्ये ९५० ते ११३० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. एवढ्या अल्प दरात ज्वारी विकावी लागत असल्याने शेतकºयांनी उत्पादनाकडेच दुर्लक्ष केल्याने हे पीक जिल्ह्यातून बहुतांशी हद्दपार होण्याच्या मार्गाप्रत पोहचले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती