अकोला: सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी असलेल्या जावयाचा धारदार शस्त्रांनी खून करणार्या आरोपी साळय़ास जुने शहर पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. सोनटक्के प्लॉटमधील मजीद खान शेखावत खान (६३) याचा सै. चांद सै. महबूब (४0) याने गुरुवारी हरिहरपेठ पोलीस चौकीच्या बाजूला खून केला होता. या प्रकरणातील सोमवारी कारागृहात पाठविण्यात आले. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. विजय पंचोली यांनी, तर आरोपीतर्फे अँड. केशव एच. गिरी व वैशाली गिरी भारती यांनी कामकाज पाहिले.
जावयाच्या खून करणारा आरोपी कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 02:15 IST