शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के पुनर्वसनासाठी जांभावासीयांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:16 IST

Murtijapur News : २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.

मूर्तिजापूर : काटेपूर्णा नदीवरीर मंगरूळकांबे येथे झालेल्या बॅरेज मुळे बाधित झालेल्या जांभा गावचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. विविध आंदोलने करुन हे गावकरी आपली मागणी पुढे रेटत असताना २५ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी मारोतीच्या पारावर तीसरे अन्नत्याग आंदोलन केले.               तालुक्यातील मंगरूळ कांबे बॅरेजची कामे मात्र रखडलेली आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेस मुळे बाधित झालेले गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असल्याने गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विविध आंदोलनास आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला. गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सदर केला व गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभाा बुद्रुक गावांमध्ये विकासाची कामे करणेबाबत पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही पुनर्वसनासाठी टाळाटाळ करण्यात येऊन गावकऱ्यांना झुलवत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशःता बाधित असल्याबाबतचा जावई शोध लावण्यात आला. परंतु शासन जोपर्यंत जाभां बु. गावाचे १०० टक्के पुनर्वसन करीत नाही तोपर्यंत विविध आंदोलने छेडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारी जाभा येथील हनुमानाच्या पारावर एक दिवसाचे लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले.             प्रकल्पामुळे गावातील घरे मोडकळीस आलेली असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.गेल्या ११ वर्षापासून गावकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात येत असल्याने आता गावकरी सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. सद्यस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे. या अन्नत्याग आंदोलनात यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला