शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात जाळली जलकुंभी

By admin | Updated: May 23, 2016 01:50 IST

पर्यावरणाकडे मनपाचेच दुर्लक्ष

अकोला: मोर्णा नदीच्या पात्रात उगवलेली जलकुंभी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल चौदा लाख रुपयांची तरतूद करत दोन टप्प्यांत निविदा काढली. संबंधित कंत्राटदाराने नदी पात्रातून जमा केलेल्या जलकुंभीची दुसर्‍या ठिकाणी विल्हेवाट लावण्याची गरज असताना चक्क नदी पात्रातच जलकुंभी जाळण्याचे प्रकार होत आहेत. अकोलेकरांना वृक्ष संवर्धनाचे आवाहन करणार्‍या मनपाकडून पर्यावरणाची ऐशीतैशी केली जात असल्याची टीका होत आहे.मोर्णा नदीच्या पात्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभी उगवली. हिंगणा परिसरापासून ते मुख्य गणेश घाट, ते दगडी पूल ते रेल्वे पुलापर्यंत उगवलेल्या जलकुंभीमुळे नदीकाठच्या रहिवाशांची झोप उडाली. जलकुंभीमुळे नदीतील घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली. परिणामी नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले. यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने जलकुंभी काढण्याची निविदा प्रकाशित केली. याकरिता चौदा लाख रुपये किंमत निश्‍चित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात सिटी कोतवाली ते दगडी पूल ते रेल्वे पुलापर्यंंतची जलकुंभी काढण्यात आली. आता दुसर्‍या टप्प्यात अनिकट परिसर ते हिंगणा परिसरापर्यंत जलकुंभी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. निमवाडी परिसरात नदीपात्रातून जमा केलेल्या जलकुंभीची इतर ठिकाणी विल्हेवाट लावणे सहज शक्य असताना नदीच्या काठावर जलकुंभीचे ढीग जमा करण्यात आले. उन्हामुळे वाळल्यानंतर जलकुंभीच्या ढिगार्‍याला पेटवून देण्याचे काम होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्यासोबतच प्रदूषणाला हातभार लागत असल्याने मनपाच्या धोरणावर अकोलेकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.