शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

जय शंभुराजे... जयघोष करीत ढोलताशांच्या गजरात निघाली शोभायात्रा

By नितिन गव्हाळे | Updated: May 14, 2024 22:12 IST

छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव

अकोला : टाळ-मृदुंगाचा नाद, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा एकच जयघोष करीत, मंगळवार १४ मे रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून छावा संघटनेच्या वतीने दिमाखात शोभायात्रा काढण्यात आली.

कोरोना आणि गतवर्षी दंगलीची संचारबंदीमुळे तीन वर्षे छत्रपती संभाजी महाराज जयंती शोभायात्रा खंडित झाली होती. मात्र, यंदा जल्लाेष व उत्साहात छावा संघटनेने शोभायात्रा काढली. सर्वप्रथम आमदार रणधीर सावरकर, लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, भाजप शहराध्यक्ष जयंत मसने, डॉ.दीपक मोरे, डॉ.संजय सरोदे, डॉ.श्रीराम लाहाेळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन व हारार्पण करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

शोभायात्रेच्या अग्रस्थानी अश्व, टाळ-मृदुंगाच्या तालावर पावली खेळणारी मुले, अश्वांवर छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील बालके आणि फेटे परिधान केलेल्या युवती होत्या. सामाजिक संदेश देणारे १५ चित्ररथ शोभायात्रेत सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज घेतलेल युवक छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करीत होते. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, अकोट रोड, शहीद अब्दुल हमीद चौक, टिळक रोड मार्गाने होत, सिटी कोतवाली चौकात पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. ही शोभायात्रा गांधी रोडमार्गे खुले नाट्यगृह येथे पोहोचली.

या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला, तसेच शोभायात्रेतील नागरिकांसाठी अल्पोपहार, चहा, शरबत, जलपानाचीही व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, अरविंद कपले, अनिरुद्ध भाजीपाले, ओमप्रकाश सावल, डॉ.हर्षवर्धन मालोकर, प्रदीप खाडे, रजनीश ठाकरे यांच्यासह निवृत्ती वानखडे, बबलू पाटील वसू, डॉ.संतोष भिसे, गोपालराव गालट, मनोहर मांगटे पाटील, गोपाल पाटकर, बाळासाहेब लाहाेळे, श्याम कोल्हे, प्रवीण बानेकर, परीक्षित बोचे, योगेश गोतमारे, पंकज कौलखेडे, गणेश इंगळे, संजय घोगरे, बाबू पाटील, देवेंद्र मोहोकार, संतोष भोरे, सोनू गिरी, निखिल श्रीनगर, अमोल हिंगणे, बबलू पाटील-मांगटे, नितीन चव्हाण, वसंतराव पोहरे, बाळासाहेब भागवत, पंजाब भागवत, शैलेश भाकरे, संदीप वाकोडे, रितेश खुमकर, श्याम कुलट, चेतन लोखंडे, संदीप कुलट गजानन भारती, सूरज कावळे आदी सहभागी झाले होते.

हवेतील साधू, पोटात तलवार असलेला चित्ररथ आकर्षणछावाच्या शोभायात्रेमध्ये हवेत तपश्चर्या करणाऱ्या साधूसह पाेटात तलवार घुसविलेल्या युवकाचा देखावा विशेष आकर्षण ठरला होता. हा देखावा पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी युवकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.आदिवासी नृत्य व वाद्यांनी आणली रंगतछत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष करून अकोट तालुक्यातील सातपुडा भागातील आदिवासी बांधवांना पाचारण करण्यात आले होते. आदिवासी महिला व पुरुषांनी त्यांच्या पारंपरिक वाद्यांवर नृत्य करीत नागरिकांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Akolaअकोला