शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात 'जननी-२' चा जागर; महिला सुरक्षेच्या कार्यक्रमांचे शतक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:11 IST

अकोला: जिल्ह्यातील महिला, मुली व युवतींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून १२ ते २२ जुलैदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जननी-२ चा जिल्हाभर प्रचंड जागर सुरू आहे.

ठळक मुद्देजनजागृतीसाठी रोजच कार्यक्रम आयोजित केल्याने केवळ सहा दिवसांतच कार्यक्रमांचे शतक झाले आहे.शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिर्नींसह महिला संघटनांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन जनजागृती सुरू केली आहे. १२ ते २२ जुलै या कालावधीत याच उपक्रमाचा दुसरा टप्पा मोठ्या जोमात सुरू केला आहे.

- सचिन राऊत

अकोला: जिल्ह्यातील महिला, मुली व युवतींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून १२ ते २२ जुलैदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जननी-२ चा जिल्हाभर प्रचंड जागर सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी व जनजागृतीसाठी रोजच कार्यक्रम आयोजित केल्याने केवळ सहा दिवसांतच कार्यक्रमांचे शतक झाले आहे. यामध्ये शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिर्नींसह महिला संघटनांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन जनजागृती सुरू केली आहे.महिलांवर चार भिंतीच्या बाहेर होणारे अत्याचार गंभीर विषय असला, तरी चार भिंतीच्या आतमध्ये म्हणजेच कौटुंबिक कलहामध्ये होणाºया अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी चार भिंतीच्या आत होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांची जागृती व्हावी, लहान मुलींनी गुड-टच बॅड-टच कळावा, अत्याचाराला वेळीच वाचा फोडण्यासाठी महिलांमध्ये शक्ती निर्माण करावी म्हणून जननी हा उपक्रम सुरू केला होता. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनीही महिलांवरील अत्याचाराचा पूर्णपणे सखोल अभ्यास केल्यानंतर जननी उपक्रमाची आवश्यकता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी १२ ते २२ जुलै या कालावधीत याच उपक्रमाचा दुसरा टप्पा मोठ्या जोमात सुरू केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जननी-२ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याने सध्या जिल्हाभर जननी-२ चा जागर असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पोलीस अधीक्षक कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने विविध कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन करीत आहेत. ५० हजारांवर महिलांना मार्गदर्शनजननी-२ या उप्रक्रमांतर्गत केवळ सहा दिवसांत कार्यक्रमांचे शतक गाठण्यात आले आहे, तर शाळा-महाविद्यालये, महिला संघटनांच्या माध्यमातून आतापर्यंत अकोला पोलिसांनी तब्बल ५० हजारांवर युवती, महिला व मुलींना सुरक्षेविषयी व जनजागृतीसाठी मार्गदर्शन केले आहे. महाविद्यालयांमध्ये अधिक कार्यक्रम घेण्यात आले असून, मीडिया व्हॅनद्वारेही ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयांत तक्रारपेट्याअकोला पोलिसांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावलेल्या आहेत. एखाद्या मुलीची छेडखानी किंवा तिला रस्त्यावर कुणी काही टॉन्टिंग करीत असेल, तर तिने या तक्रारपेटीत तक्रार करावी, ही तक्रारपेटी दर आठवड्यात उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुलीचे नाव गोपनीय ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस