शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रवेशाची टक्केवारी वाढली;  विद्यार्थी वळताहेत आयटीआयकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:37 IST

अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असल्याने, त्याकडे विद्यार्थ्यांचा कल दरवर्षी वाढत आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र व्यवसायासोबतच खासगी कंपनी, महावितरण कंपनीमध्ये नोकरी करीत आहेत. एकंदरीतच दरवर्षी आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत अडीच हजार विद्यार्थ्यांनी ही संख्या वाढली आहे.

अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असल्याने, त्याकडे विद्यार्थ्यांचा कल दरवर्षी वाढत आहे. आयटीआयमधील सर्वच शाखांमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतंत्र व्यवसायासोबतच खासगी कंपनी, महावितरण कंपनीमध्ये नोकरी करीत आहेत. एकंदरीतच दरवर्षी आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत अडीच हजार विद्यार्थ्यांनी ही संख्या वाढली आहे.काही वर्षांपूर्वी आयटीआय प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अवकळा प्राप्त झाली होती; परंतु अलिकडच्या दोन वर्षांमध्ये आयटीआयला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. खासगी कंपन्यासुद्धा अभियांत्रिकीची पदवी घेणाºया विद्यार्थ्यांपेक्षा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्याला कमी वेतनात नोकरी देतात. मुंबई, पुणे येथील कंपन्यांमध्ये १५ ते २0 रुपये वेतनामध्ये शेकडो आयटीआय विद्यार्थ्यांना नोकºया मिळत आहेत. केंद्र शासनानेसुद्धा मेक इन इंडिया, स्कील इंडियासारखे उपक्रम सुरू करून कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहेत. एवढेच नाही तर केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले आहे. कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा. विद्यार्थ्यांनी नोकरीसोबतच स्वतंत्र व्यवसाय उभारावा. हा उद्देश आहे. औद्योगिक प्रशिक्षणातून खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये रोजगार मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात या अभ्यासक्रमाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळेच शासनानेसुद्धा आयटीआयच्या विविध शाखांमधील प्रवेश क्षमता १ लाख ३७ हजार ६१0 पर्यंत वाढविली आहे. राज्य शासनाने कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय सुरू करून कुशल महाराष्ट्र...रोजगार युक्त महाराष्ट्र हे घोषवाक्यसुद्धा दिले आहे. यानुसार आयटीआयतील मुला-मुलींसाठी भरती रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. (प्रतिनिधी)मुला-मुलींसाठी असलेले अभ्यासक्रमइलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, कॉम्प्यूटर आॅपरेटर, टर्नर, मोटार मॅकेनिक, वायरमन, पेंटर(जनरल) आणि मुलींसाठी सेक्रेटेरियल प्रक्टीस(इंग्रजी), ड्रेसमेकींग, बेसिक कॉसमॅटोलॉजी, बेकर कन्फेक्शनर, फ्रुटस् अ‍ॅण्ड व्हिजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर आॅपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंटेरियर डेकोरेशन अ‍ॅण्ड डिझाईन, फॅशन डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, इन्फॉरमेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आदी शाखा उपलब्ध आहेत.

शासनाने कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्रचे ध्येय समोर ठेवून युवक, युवतींना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या उद्देशाने संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आयटीआयमधील कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे युवक, युवतींचा ओढा आयटीआयकडे वाढला आहे.- प्रमोद भंडारे, प्राचार्य, आयटीआय, मुलींची.

 

टॅग्स :Akolaअकोलाiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी