शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शेतमालाला उत्पादन खर्चानुसार दर देणे शक्य होणार - पाशा पटेल

By admin | Updated: November 14, 2015 02:26 IST

शेतक-यांना मिळणार दिलासा : हमी भाव अभ्यासण्यासाठी नेमलेल्या समितीद्वारा केंद्राकडे अहवाल सादर.

चिखली (जि. बुलडाणा): आजघडीला कृषिव्यवसायाचे संदर्भ पूर्णपणे बदलले आहेत. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍यांपुढील समस्या गंभीर झाल्या आहेत. ही बाब ध्यानी घेऊन शेतमालाचा हमी भाव जाहीर करण्यासाठीची पद्धत अभ्यासण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अंतिम अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुपूर्द केला असून, या अहवालात शेतमालाचे हमी भाव जाहीर करण्यासाठी अनेक आमूलाग्र व शेतकरीहिताचे बदल सुचविण्यात आलेले आहेत. समितीने सुचविलेले बदल व शिफारशी केंद्र शासन व नीती आयोगामार्फत स्वीकारण्यात येणार असल्याने हमी भाव ठरविण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊन शेतकर्‍यांचे अर्थशास्त्र सुधारण्याची योग्य वेळ नजरेच्या टप्प्यात आली असल्याची माहिती शेतकरी नेते तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली. शेतकरी नेते पाशा पटेल हे १३ नोव्हेंबर रोजी चिखली येथे आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती विशद केली. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे युवा नेते संजय चेके पाटील, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष दादासाहेब मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, भारत वाघमारे, नितीन राजपूत, हरी शेळके, सचिन पडघान, रमेश बाहेकर, पांडुरंग सवडदकर यांची उपस्थिती होती. यावेळी पटेल म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीतील पुसा या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश चंद्र यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेल्या हमी भाव जाहीर करण्यासाठीची पद्धत अभ्यासण्यासाठी नेमलेल्या समितीने नुकताच आपला अंतिम अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपुर्द केला. या अहवालामध्ये शेतमालाचे हमी भाव जाहीर करण्यासाठी अनेक आमूलाग्र बदल सुचविण्यात आलेले आहेत. सोबतच या समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश चंद्र यांची नीती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने या समितीच्या शिफारशी केंद्र शासन आणि नीती आयोगाकडून स्वीकारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतमालाचा हमी भाव वास्तव उत्पादनखर्चाशी सुसंगत होऊन सुधारणा होऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. सोबतच उत्पादन खर्चानुसार हमी भाव जाहीर होणार असल्याने शेतकर्‍यांच्या पदरात दोन पैसे अधिक पडतील व त्यांचा आर्थिक स्तर आपसूकच उंचावणार आहे. आजपर्यंंंत शेतमालाचा उत्पादनखर्च आकारताना भूस्वामी असलेला शेतकरी आणि शेतमजूर यांना अकुशल कामगार म्हणून त्यांची मजुरी गृहित धरली जात असे. ते यापुढे कुशल कामगार म्हणून गृहित धरावेत. बैलांचे काम करण्याचे दिवस केवळ १३ गृहित धरले जात होते. ते यापुढे ३६५ गृहित धरण्यात यावेत. महत्त्वाची बाब म्हणजे, जमिनीचे भूभाडे हे वास्तवावर आधारित आकारण्यात यावे. राज्यात ज्याप्रमाणे वास्तवात भूभाडे आकारण्यात येते, त्याप्रमाणे ते हेक्टरी पाच हजारऐवजी २५ हजार रुपये आकारण्यात यावे. यांसारख्या महत्त्वपूर्ण शिफारशी या समितीने केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशींपैकी अध्र्याअधिक शिफारशी स्वत: पाशा पटेल यांनी केल्या असून, त्यांचा वेळोवळी पाठपुरावादेखील केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.