शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस बरसला; जिल्ह्याला यलो अलर्ट

By रवी दामोदर | Updated: September 29, 2023 18:50 IST

व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली होती. 

रवी दामोदर, अकोला : हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार, परतीचा पाऊस मुसळधार बरसण्याचा अंदाज आहे. शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली होती. 

यंदाच्या पावसाळ्यातील सुरुवातीचा जून महिना बहुतांशी कोरडा गेला. त्यामुळे पेरणीला तुलनेने विलंब झाला. जुलै महिन्यात पावसाने साथ दिल्याने पेरणीची कामे आटोपण्यात आली; मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे पिके धोक्यात सापडली होती. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीपासून पावसाचा धडाका सुरू आहे. जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. तो पिकांसाठी अजिबात पोषक नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोयाबीनवर आधीच पिवळा मोझॅक येऊन उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असताना आता अतिपाण्याने संकटात अधिकच भर पडणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेउु नये. पुरस्थितीत पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल/रस्‍ता ओलांडु नये. नदी-नाला काठावर सेल्‍फी काढण्‍याचा मोह करु नये. पुरस्थितीत उंच ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना देण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस