शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

‘तो’ प्रकाश नागमणीचा नव्हे तर चायनामेड बॅटरीचा !

By admin | Updated: February 22, 2017 02:28 IST

महसूल, पोलीस यंत्रणेने उलगडले रहस्य

देऊळगावराजा, दि. २१- तालुक्यातील सावखेड भोई येथे विहिरीमधून रात्रीच्या वेळेस पडणार्‍या प्रकाशाचा छडा पोलीसांनी लावला असून तो प्रकाश चायनामेड बॅटरीचा असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे परिसरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या कथित नागमणीच्या प्रकाशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.सावखेड भोई येथील एकनाथ वाघमारे यांच्या विहीरीमधून गेल्या आठ दिवसापासून रात्रीच्या वेळी प्रकाश पडत होता. हा प्रकाश ह्यनागमणीह्णचा असल्याची अफवा परिसरात पसरली. यानंतर हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती. पोलीस व महसूल यंत्रणेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. प्रभारी तहसीलदार मदन जाधव, ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच भुवैज्ञानिकांनाही लेखी माहिती दिली होती. तथापि, भुवैज्ञानिक सावखेड भोईकडे फिरकलेच नाही. विहिरीतून पडणार्‍या या प्रकाशाचे रहस्य उलगडण्यासाठी सोमवारी विहिरीतील पाणी उपसण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु विद्युतपुरवठा नसल्याने पाणी उपसता आले नाही. मंगळवारी सकाळी विहिरीतील सर्व पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यावेळी विहीरीमध्ये कुणीतरी कॅरीबॅगमध्ये दगड टाकून चायनामेड बॅटरी सुरु करुन टाकल्याचे आढळले. यामुळे कथित नागमणीच्या प्रकाशाची ती अफवा ठरली. रात्री विहीरीतून प्रकाश बाहेर पडत असल्याची अफवा देऊळगावराजा शहरालगतच्या सावखेड भोई या गावात प्रवेश करण्याच्या मार्गावर एकनाथ वाघमारे व त्यांच्या भावंडाची सामायिक विहीर आहे. या विहिरीत रात्रीच्यावेळी प्रकाश पडत असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. यानंतर हा प्रकार परिसरात सर्वांना माहीत झाला. विहीरीत नाग -नागिन असून त्यांचाच हा प्रकाश असल्याची अफवाही काही जणांनी पसरवली होती. पोलीस घेताहेत 'रँचो'चा शोध !काही वर्षापूर्वी एका हिंदी चित्रपटात आमिरखानने साकारलेली रँचोची भूमिका खूप गाजली होती. हा रँचो अफलातून प्रयोग करण्यात तरबेज होता. याच धर्तीवर विहीरीत कॅरीबॅगमध्ये दगड टाकून चायनामेड बॅटरी सुरु करुन पडणार्‍या प्रकाशाने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता, सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या सावखेड भोईच्या ह्यरँचोह्ण चा पोलीस शोध घेत आहेत.