शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य ; भुसावळ रेल्वे विभागाने दिला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:14 IST

रेल्वे मार्गाची निश्‍चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.

ठळक मुद्देरेल्वे मार्गाची वाहतूक क्षमता पडतेय कमीभविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्करेल्वे मार्गाची निश्‍चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.मुंबई-कोलकाता लोहमार्गावरील  अकोला रेल्वेस्थानकावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. विदर्भातून मुंबईकडे आणि मुंबईतून विदर्भाकडे येणार्‍यांची प्रवासी संख्या जास्त असल्याने रेल्वे तिकीट आरक्षणाची प्रतीक्षा यादी कायम मोठी असते. सकाळी साडेअकरा वाजता गीतांजली एक्स्प्रेसनंतर आणि सायंकाळच्या  ६ वाजताच्या मेलपर्यंत थेट मुंबईकडे जाणारी रेल्वे गाडी अकोल्यातून नाही. पाच-सहा तासांच्या या काळात काही रेल्वे गाड्या अकोला मार्गे वळविल्या तर अकोलेकरांसाठी सुविधा उपलब्ध होईल. अशा आशयाची मागणी अकोल्यातून सातत्याने होत असते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये अकोलेकरांना रेल्वेगाड्या वाढण्याची अपेक्षा असते. तांत्रिक कारणांमुळे अकोल्यातून रेल्वे गाड्या धावू शकत नाही, ही बाब मात्र अनेकांना ठाऊक नाही. याबाबतचा गोपनीय अहवाल रेल्वे प्रशासनाने पाठविला आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त रेल्वेगाड्या अकोला रेल्वे ट्रॅकवरून धावताहेत का, अशी विचारणा स्थानक प्रबंधक जी.बी. मीणा यांना केली असता, त्यांनी दुजोरा दिला. मात्र, याबाबत मला काही बोलण्यास नकार दिला.

क्षमता १३0 गाड्यांची धावताहेत १८६.अकोला रेल्वेस्थानकाच्या ट्रॅकची क्षमता दररोज १३0 गाड्यांची आहे. मात्र, अकोल्याच्या रेल्वे ट्रॅकवरून अप-डाऊन बाजूच्या पकडून दररोज १६0 ते १८६ गाड्या धावतात. दररोजची ही वाहतूक ट्रॅकच्या क्षमतेपेक्षा  जास्त झाली आहे. प्रवासी गाड्यापेक्षा कोळसा आणि सिमेंटची वाहतूक करणार्‍या मालगाड्यांची संख्या या मार्गावर जास्त आहे. त्यामुळे या अकोला ट्रॅकवर ओव्हर लोड होत आहे.

ट्रॅकची क्षमता नसल्याने नवीन रेल्वे गाड्या या मार्गे वाढविता येणार नाही. मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना थेट अकोल्यातून आरक्षण मिळत नसले, तरी भुसावळहून अनेक रेल्वे गाड्या मुंबईकडे धावणार्‍या आहेत. दोन टप्प्यात प्रवास केला, तर ही समस्या दूर होऊ शकते.-वसंत बाछुका, रेल्वे समिती सदस्य.

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक