शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी अ‍ॅक्ट’मुळे राज्यातील पतसंस्था धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:08 IST

अनेक पतसंस्थांना उत्पन्नापेक्षा आयटीच्या कराचीच जास्त रक्कम मोजावी लागत असल्याचे चित्र आहे.

अकोला : एक कोटी रुपयांवर वार्षिक रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेमुळे प्राप्तिकर खात्याकडून दोन टक्के कपात होत असल्याने राज्यातील पतसंस्था धोक्यात आल्या आहेत. अनेक पतसंस्थांना उत्पन्नापेक्षा आयटीच्या कराचीच जास्त रक्कम मोजावी लागत असल्याचे चित्र आहे.कॅशलेस व्यवहारास चालना मिळावी, रोख रकमेचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारने बँकिंग आणि आयटी अ‍ॅक्टद्वारे प्रचंड कोंडी केली आहे. त्याचा फटका आता राज्यातील पतसंस्थांना बसू लागला आहे. पतसंस्थांच्या उत्पन्नापेक्षा जास्त आयटी कराची रक्कम भरावी लागत आहे. प्रत्येक पतसंस्थाच्या आर्थिक विवरणासाठी पॅन कार्ड काढलेले असते. पतसंस्थेच्या शाखा अनेक असल्या तरी त्यासाठी एकच पॅन कार्ड जोडले जाते. १९४ एनच्या नियमावलीनुसार वर्षात एक कोटीची रोख रक्कम काढण्याची मर्यादा आहे. वर्षभरात एक कोटीच्यावर रक्कम जाताच प्राप्तिकर खात्यातर्फे दोन टक्के कर कपात केल्या जातो. एक कोटींचा कर दोन लाख आणि त्याहून जास्त असेल तर करदेखील वाढत जात आहे. राज्यात विविध पतसंस्था असून, त्याचे सर्वसामान्य सभासद मोठ्या प्रमाणात अशिक्षित, अज्ञानी आहेत. विविध प्रकारच्या कामगार आणि लघू व्यावसायिकांच्या पतसंस्थांना तर दर महिन्यात कॅश काढण्याची वेळ येते. त्यामुळे दोन टक्क्यांच्या हिशेबाने कोट्यवधीची कपात होत आहे. एकीकडे आर्थिक मंदी आणि दुसरीकडे दोन टक्के कर कपाती होत असल्याने राज्यातील पतसंस्था धोक्यात सापडल्या आहेत. अकोल्यातील पतसंस्थादेखील यातून मार्गक्रमण करीत असून, काही पतसंस्था आपला गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाIncome Taxइन्कम टॅक्स