शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सिंचन, पाणलोटाचे धोरण ठरणार!

By admin | Updated: August 9, 2014 02:04 IST

भूस्तराचा निश्‍चित नकाशा नाही; केंद्रशासनाचा पुढाकार, तज्ज्ञांचे घेणार मार्गदर्शन

अकोला : रूलर डेव्हलपमेंट मिशन कार्यक्रमांतर्गत देशातील ग्राम विकासाच्याबाबतीत केंद्र शासनाने ९ सप्टेंबर रोजी तज्ज्ञांची सभा बोलावली आहे. सभेत राज्यातील सिंचन योजना, पाणलोट आदी विषयांवर तज्ज्ञांची मते जाणून घेतली जाणार असून, निश्‍चित धोरण ठरविण्यात येणार आहे. राज्यात भूजलस्तराचा अभ्यास व निश्‍चित नकाशा नसल्याने, वाट्टेल त्या ठिकाणी पाणलोटाची कामे केली जात आहे. राज्यात वेगवेगळ्या विभागाकडून ही कामे केली जात असल्याने, कामात सुसूत्रता असावी, यासाठीचे निश्‍चित धोरण ठरविण्याची गरज असल्याने केंद्रीय ग्रामीण विकास चळवळ (रू लर डेव्हलपमेंट मिशन) कार्यक्रमांतर्गत देशातील तज्ज्ञांची मते जाणून घेतली जाणार आहेत. यासाठी केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने या राज्यातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. राज्यातील सिंचना योजना, पाणलोटाचा विकास साधण्यासाठी समतोल विकास उच्चाधिकार समितीने त्यांच्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. यात प्रामुख्याने निश्‍चित भूजल स्तराचा अभ्यास व नकाशा नसल्याने, राज्यात वाट्टेल त्या ठिकाणी पाणलोटाची कामे केली जात असून, जलसपंदा, कृषी विभाग, पश्‍चिम घाट विकास या विविध यंत्रणेमार्फत ही कामे केली जात आहेत. शिवाय सिमेंट नाला बांध, ढाळीचे बंधारे, नाला बंडिंग आदी विविध पद्धतीने जी कामे केली जात आहेत, त्यामुळे या बंधार्‍यांचे आयुष्य किती, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकदा बंधारा बांधल्यानंतर त्या बंधार्‍यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे होत नसल्याने राज्यातील शेकडो बांध फुटले आहेत. यासाठी यातील दोष दूर करू न या कामात सुसूत्रता आणावी आणि प्रत्येक काम कालबद्ध पद्धतीने विहीत वेळेत व्हावे, असेही या समितीने म्हटले आहे. दरम्यान, रू लर डेव्हलपमेंट मिशन कार्यक्रमांतर्गत देशातील ग्राम विकासाच्याबाबतीत केंद्र शासनाने ९ सप्टेंबर रोजी आयोजित तज्ज्ञांच्या सभेत राज्यातील सिंचन योजना, पाणलोट आदी विषयांवर तज्ज्ञांची मते जाणून घेतली जाणार असून, निश्‍चित धोरण ठरणार आहे. या राज्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठीची राज्यातील काही तज्ज्ञांनी तयारी सुरू केली आहे.