शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

वर्‍हाडातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवट!

By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST

अकोला जिल्ह्यातील एकाच प्रकल्पाची घडभरणी झाली असून इतर सर्वच सिंचन प्रकल्पाची कामे रखडली

अकोला : जिल्ह्यातील तीन सिंचन प्रकल्पांपैकी प्रत्यक्षात एकाच प्रकल्पाची घडभरणी झाली असून, इतर सर्वच सिंचन प्रकल्पाची कामे अर्धवट स्वरू पात रखडली आहेत. कवठा बॅरेज व सुकळी सिंचन प्रकल्पाचे कामही थंडबस्त्यात पडले आहे. पश्‍चिम विदर्भातील ३३ प्रकल्पाची घडभरणी यावर्षी होणे अपेक्षित होते; परंतु यातील सर्वच प्रकल्पाची कामे रखडली आहेत.विभागातील १0२ प्रकल्पांची कामे व्हावी, यासाठी राज्यपालांनी या प्रकल्पाचा समावेश अनुशेष यादीत केलेला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १0 प्रकल्पांपैकी बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेज, सुकळी अकोला, पोपटखेड टप्पा दोन आकोट, कवठा शेलू व पातूर तालुक्यातील प्रकल्पांची घडभरणी यावर्षी जूनमध्येच होणे अपेक्षित होती. तथापि यातील हिवरा या एकाच प्रकल्पाची घळभरणी झाली आहे. या प्रकल्पाची सुधारित किंमत मात्र वाढली आहे. तथापि, सुकळी प्रकल्प अजून भूसंपादनाच्या गर्तेत अडकला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता जानेवारीमध्ये पाटबंधारे विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. कवठा बॅरेज बाळापूर तालुक्यातील गावांना वरदान ठरणार आहे. तथापि, या बॅरेजची अवस्था इतर प्रकल्पासारखी अधांतरी आहे. पोपटखेड टप्पा २ या प्रकल्पाला तर या यादीतूनच वगळले आहे. नेरधामणाचे काम सुरू झाले आहे. या कामाला गती देण्याची गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास खारपाणपट्टय़ातील शेती व शेतकर्‍यांना लाभ होईल. अनेक प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय मान्यता दिल्यास या कामांना सुरुवात होईल; परंतु पावसाळा लागल्याने या प्रकल्पाची कामे आता दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय मान्यतेअभावी अनेक प्रकल्प रखडलेसुकळी व अन्य प्रकल्पाचे सुधारित प्रशासकीय प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्यांना मान्यता मिळेल. हिवरा प्रकल्पासह इतर प्रकल्पांची घडभरणी झाली आहे. उर्वरित कामे मार्गी लागतील असे पाटबंधारे अधीक्षक अभियंता जलतारे,यांनी सांगीतले.