शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कीटकनाशकांच्या साठ्यांमध्ये अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:50 IST

अकोला : कीटकनाशकांची गुणवत्ता तसेच कालबाह्य जहाल कीटकनाशकांचा साठा तपासणीच्या धडक मोहिमेच्या अहवालातून राज्यातील ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात अनियमितता उघड झाल्या आहेत.

ठळक मुद्देराज्याच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रकांनी उत्पादक कंपन्यांचा २० आॅगस्टपर्यंत खुलासा मागीतला आहे.आता परवाने रद्द, निलंबन, साठा विक्री बंदची कारवाई लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत.धडक तपासणी मोहिमेतील पथकांचे अहवाल कृषी आयुक्तालयातील राज्याच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रकांकडे सादर करण्यात आले.

- सदानंद सिरसाटअकोला : कीटकनाशकांची गुणवत्ता तसेच कालबाह्य जहाल कीटकनाशकांचा साठा तपासणीच्या धडक मोहिमेच्या अहवालातून राज्यातील ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात अनियमितता उघड झाल्या आहेत. कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्याच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रकांनी उत्पादक कंपन्यांचा २० आॅगस्टपर्यंत खुलासा मागीतला आहे. आता परवाने रद्द, निलंबन, साठा विक्री बंदची कारवाई लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत.पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. त्यामुळे कीटकनाशक उत्पादन, त्याची साठवणूक करताना आवश्यक ती खबरदारी न घेताच शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने उशिरा म्हणजे, जुलैच्या मध्यात कीटकनाशकांची गुणवत्ता, साठा तपासणीची धडक मोहीम राबविली. राज्यभरात एकाच वेळी १२ ते १४ जुलैदरम्यान गोदामातील साठ्यांची तपासणी झाली. तसेच गुणवत्ता तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.धडक तपासणी मोहिमेतील पथकांचे अहवाल कृषी आयुक्तालयातील राज्याच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रकांकडे सादर करण्यात आले. त्यामध्ये कंपन्यांनी साठा करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे पुढे आले. सोबतच प्रयोगशाळेतील अहवालही प्राप्त होत आहेत. त्यानुसार साठा विक्री बंदचा आदेश दिला जात आहे.

परवाने रद्द, निलंबनाच्या नोटीसकीटकनाशकांची साठवणूक, वितरण, विक्रीचे अहवाल सादर न करणे, साठा करण्यासाठी परवाना नसणे, यासारख्या गंभीर बाबी मोहिमेत पुढे आल्या. त्यामुळे कीटकनाशके कायदा १९६८ मधील तरतुदीनुसार परवाना रद्द, निलंबित का करू नये, याचा खुलासा मागविणाºया नोटीस मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाºयांनी बजावल्या. त्यावर सुनावणी घेण्यात आली. आता लवकरच परवान्यासंदर्भात कारवाईचा आदेश दिला जाणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती