शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या सायकल खरेदीत घोळ; सभापती अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 13:15 IST

या संपूर्ण प्रकरणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांना अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या सायकल प्रक्रियेत शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच मुख्याध्यापकांनी घोळ घातल्याचे समोर आले आहे. सायकल खरेदीबाबत मुख्याध्यापकांना कोणत्याही लेखी सूचना दिल्या नसल्याचे सांगत शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, महिला व बालकल्याण अधिकारी नंदिनी दामोदर यांनी हात वर केले आहेत. याप्रकरणी मुख्याध्यापक अडचणीत सापडले असून, या संपूर्ण प्रकरणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांना अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा रवींद्र भन्साली यांनी मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाºया १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यासाठी ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित केली होती. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला. समितीने हा प्रस्ताव स्थगित ठेवल्यानंतरही मनपा शाळेतील काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना सायकल खरेदीचे निर्देश दिले. खरेदी केलेल्या सायकलची पावती शिक्षण विभागामार्फत महिला व बालकल्याण विभागाकडे सादर केल्यावर सायकलचा आर्थिक मोबदला संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार होता; परंतु स्थायी समितीने हा प्रस्ताव स्थगित ठेवल्यामुळे मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे महिला व बालकल्याण विभागाच्या पत्रानुसार मुख्याध्यापकांना सायकलसाठी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. खरेदीबाबत कोणतीही सूचना दिली नव्हती, असे सांगत याप्रकरणी शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी कानाला हात लावले आहेत.

मुख्याध्यापकांनी सायकल खरेदीची प्रक्रिया विचारली असता त्यांना केवळ माहिती दिली. खरेदी करण्यासंदर्भात कोणत्याही लेखी अथवा मौखिक सूचना दिल्या नाहीत. मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावर परस्पर सायकल खरेदी प्रक्रिया केल्याचे दिसते.- नंदिनी दामोदर,प्रभारी महिला व बाल कल्याण अधिकारी, मनपा

मनपा शाळेतील काही गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांनी पदरचे पैसे खर्च करून सायकल खरेदी केल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी आढळून येणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.- मनीषा भन्साली,महिला व बाल कल्याण समिती सभापती

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका