शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडाच्या भावात सहाशे रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:10 IST

३,४०० रुपये क्विंटल असलेले स्टील आठ दिवसांत ४,२०० रुपये झाल्याने बांधकाम व्यावसायिकांवर जबर परिणाम झाला आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आठवड्याभरात स्टीलचे (लोखंड)भाव क्विंटलमागे सहाशे रुपयांनी उसळल्याने बाजारपेठ हादरली आहे. ३,४०० रुपये क्विंटल असलेले स्टील आठ दिवसांत ४,२०० रुपये झाल्याने बांधकाम व्यावसायिकांवर जबर परिणाम झाला आहे. त्यामुळे नव्याने इमारत बांधकाम करणाऱ्यांनी तूर्त बांधकाम थांबविले आहे. स्टीलचे भाव केव्हा खाली घसरतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रप (भंगार) मोठ्या प्रमाणात भारतात दाखल झाल्याने, आॅगस्ट महिन्यात लोखंडाचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले होते. चीन,जपान आणि दुबई येथील स्क्रप (भंगार) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून थेट भारतात दाखल झाल्याने भाव घसरले होते. सहा हजार रुपये क्विंटलच्या भावाने विक्री होणारे लोखंड तेव्हापासून ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले. तेव्हापासून लोखंडात तेजी नव्हती.दरम्यान, विदेशी स्क्रपची आयात बंद होताच लोखंडाचे भाव पुन्हा चढू लागले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या चरणात पुन्हा लोखंडात तेजी आली अन् आठ दिवसांत लोखंडाचे भाव ३,४०० रुपयांवरून उसळून थेट ४,२०० वर जाऊन पोहोचले. ही भाववाढ आता पाच हजाराच्या पलिकडे जाण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. सर्वात जास्त लोखंडाची मागणी सळईच्या रूपाने इमारत बांधकामासाठी असते आणि देशाची आर्थिक नाडी इमारत बांधकामाच्या इंडस्ट्रीजवर अवलंबून आहे.देश आणि विदेशातील स्क्रपमधूनच लोखंडाची निर्मिती होते. देशाची ही भूक रायपूर आणि जालना स्टील इंडस्ट्रीज भागवित असते. बांधकाम व्यावसायात आधीच मंदी आहे. त्यात लोखंडात भाववाढ होत असल्याने आर्थिक घडी पुन्हा विस्कळीत होण्याचे संकेत आहे.बांधकाम व्यावसायिकांवर आधीच मंदीचे सावट आहे. त्यात लोखंडाचे भाव आठ दिवसात सहाशे रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय पुन्हा धोक्यात सापडला आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याची वेळ आली आहे.-दिनेश ढगे,जिल्हाध्यक्ष क्रेडाई, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय