शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवरील लुटमारमध्ये तडीपार आरोपीचा सहभाग

By admin | Updated: July 14, 2017 01:17 IST

तडीपार केलेल्या हरिहरपेठेतील एका आरोपीचा राष्ट्रीय महामार्गावर लुटमारमध्ये सहभाग असल्याने समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आठ महिन्यांसाठी तडीपार केलेल्या हरिहरपेठेतील एका आरोपीचा राष्ट्रीय महामार्गावर लुटमारमध्ये सहभाग असल्याने समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. उमेश रामचंद्र धुर्वे असे आरोपीचे नाव असून, तडीपार केल्यानंतरही तो शहराच असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे.राष्ट्रीय महामार्गावर रात्री प्रवास करणाऱ्या ट्रकचालकांना तसेच कारचालकांना अकोल्यातील एका टोळक्याने लुटमार सुरू केली होती. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. एका ट्रकचालकाला लुटल्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती पोलीस कर्मचारी राजू सोळंके यांना सांगितली. त्यांनी रात्री जीवाची पर्वा न करता ट्रकचालकाने सांगितलेल्या वर्णनाच्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करून यामधील राहुल विनोद सारवान (२५), रोहन कैलास डिकाव (२०), बलराम रामसिंग डिकाव (२०) रा. वाल्मीकी नगर अकोला, कुणाल मनोज निदाने (२५) शिवाजी नगर या चौघांना अटक केली. या ठिकाणावरून उमेश धुर्वे हा पसार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी गुरुवारी धुर्वेला हरिहर पेठेतून अटक केली. त्याची माहिती घेतली असता तो जिल्ह्यातून आठ महिन्यांसाठी तडीपार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तडीपार असतानाही त्याने ही लुटमार केली असल्याने पोलिसांचा वचक संपल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात डोईफोडे, शंकर डाबेराव, रामेश्वर सोनोने, संतोष गावंडे, अमित दुबे यांनी केली.हायवेवरील लुटमारीमागे मोठी टोळीहायवेवर ट्रक चालक आणि कारचालकांना लुटणाऱ्या टोळीमध्ये आणखी काहीजण असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सखोल तपास केल्यास तसेच बँक खाते तपासल्यास या टोळीमागच्या चेहऱ्यांचा पर्दाफाश होईल. या टोळीला चालविणाऱ्यांचे कॉल डिटेल्स व इतर माहिती घेतल्यास अनेकांची नावे समोर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.